शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विजय माल्ल्याला भारतात आणणं अवघड : उज्ज्वल निकम

By admin | Updated: April 18, 2017 18:16 IST

भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि.18 - भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड आहे अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. माल्ल्याला लंडनमध्ये आज अटक करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.  

""विजय माल्ल्या याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार भारतात आणणे अवघड आहे.  तेथील न्यायालयात आपल्या तपास यंत्रणेचे  पुरावे टिकत नाहीत, तिथला गुन्हेगार हस्तांतरण  कायदा किचकट आहे. गुलशन कुमार हत्याकांडात नदीम सैफ याच्याबाबत मी याचा चांगला अनुभव घेतला आहे. आपल्या देशातील कायद्यानुसार गुन्हा होत असला तरी तो ब्रिटिश कायद्यानुसार गुन्हा ठरतो असे नाही, त्यामुळे माल्ल्याला भारतात आणणं कठीण आहे"".  कोपर्डी खटल्याच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम अाज अहमदनगर आले होते.   

 भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या लंडनमध्ये आहे. विजय मल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी आज अटक केली होती, मात्र काही वेळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.  काही दिवसांपूर्वीच त्याच्याविरोधात दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी  अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले होते.