शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

विद्यापीठाचा सावध पवित्रा

By admin | Updated: August 8, 2014 01:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एलएलबी’ अभ्यासक्रमातील निकालातील ‘मॅजिक’बद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठात धडकले होते.

‘एलएलबी’तील ‘मॅजिक’: विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संतापनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एलएलबी’ अभ्यासक्रमातील निकालातील ‘मॅजिक’बद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठात धडकले होते. परंतु यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना साधे चौकशीचे आश्वासनही दिले नाही. पहिले जुन्या व सुधारित दोन्ही गुणपत्रिका घेऊन या, मग पाहू, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तीन वर्षीय ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरच्या (सीबीएस) निकालात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चक्क दोन विषयांत सारखे गुण देण्यात आले होते. परंतु त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निकालांत अनेकविद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली असून, ही बाब थोड्याथोडक्या नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांसोबत झाली आहे. अगदी ‘टॉपर्स’मध्ये असलेले विद्यार्थी अ़नुत्तीर्ण झाले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.गुरुवारी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात निरनिराळ्या महाविद्यालयांतील विद्यार्थी एकत्रित आले होते. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांची भेट घेतली. प्र-कुलगुरूंनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली; परंतु कोणत्याही चौकशीचे आश्वासन दिले नाही. सोबतच विद्यार्थ्यांनी जुन्या तसेच सुधारित निकालाची प्रत द्यावी, असेदेखील म्हटले. केवळ निवडक विद्यार्थ्यांकडेच प्रत उपलब्ध असल्यामुळे त्यांना शुक्रवारी बोलाविण्यात आले आहे. परीक्षा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व घोळ सुरुवातीच्या चुकीमुळे झाला. दोन विषयांत सारखे गुण देण्यात आले होते. सुधारित निकालांत ही चूक सुधारण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले होते ते गुणपत्रिकेत नमूद आहेत, अशी बाजू मांडण्यात आली आहे. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)