शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या पाठीच्या दुर्मीळ गिधाडांचे नाशकात दर्शन

By admin | Updated: February 15, 2016 04:01 IST

भारतातून नामशेष होणाऱ्या गिधाडांच्या प्रजातींचे नाशिकच्या आदिवासी भागात ग्रामस्थ व वनविभागाच्या प्रयत्नाने संवर्धन झाले असून, हरसूलजवळील खोरीपाडा येथील ‘गिधाड रेस्तरां’वर लांब

अझहर शेख,  नाशिकभारतातून नामशेष होणाऱ्या गिधाडांच्या प्रजातींचे नाशिकच्या आदिवासी भागात ग्रामस्थ व वनविभागाच्या प्रयत्नाने संवर्धन झाले असून, हरसूलजवळील खोरीपाडा येथील ‘गिधाड रेस्तरां’वर लांब चोचीच्या व पांढऱ्या पाठीच्या तब्बल २३० गिधाडांचे दर्शन झाल्याने वनविभाग आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्यातून पक्षिप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकारांची पावले आता येथील ‘गिधाड रेस्तरां’कडे वळू लागली आहेत.चार वर्षांपासून गिधाडांसाठी या परिसरात मृत जनावरे आदिवासी स्वयंस्फूर्तीने आणून टाकतात. त्यांना वनविभागाचे सहकार्य मिळते. पहिल्यांदा येथे १५० गिधाडांची नोंद झाली. त्यानंतर डोंगरमाथ्यांवर गिधाडांची वस्ती तयार होऊ लागली. निसर्गातील पक्ष्यांच्या प्रजातींमधील अत्यंत महत्त्वाची प्रजाती व निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणून ओळखली जाणारी गिधाडे नामशेष होत चालली आहेत. भारतातही गिधाडांची संख्या कमालीने घटली असून, याचे मुख्य कारण जनावरांना उपचारादरम्यान अधिक प्रमाणात दिले जाणारे वेदनाशामक (डायक्लोफिनॅक) औषधी आहेत. त्या पार्श्वभूमीवर मृत जनावरे खाद्य म्हणून टाकून गिधाडांच्या संवर्धनाचा उपक्रम राबविला जात आहे.चार वर्षांपासून खोरीपाड्यावर गिधाड संवर्धन सुरू आहे; मात्र या वर्षी प्रथमच पांढऱ्या पाठीच्या गिधाडांनी दर्शन दिल्याने संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कामाला मोठे यश मिळाले आहे. तब्बल २३० गिधाडे दोन दिवस मुक्कामी होती. - शंकर शिंदे, अध्यक्ष, वनव्यवस्थापन समिती