शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी अणे यांची गांभीर्याने दखल घ्यावी !

By admin | Updated: January 18, 2016 04:00 IST

साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड : अ‍ॅडव्होकेट जनरल हा शासनाचा, राज्याचा प्रतिनिधी आहे. मराठी राज्याचा प्रतिनिधी मराठी भाषकांपेक्षा वेगळी भूमिका मांडत असेल, तर राज्यकर्त्यांनी गांभीर्याने नोंद घ्यायला हवी.

साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड : अ‍ॅडव्होकेट जनरल हा शासनाचा, राज्याचा प्रतिनिधी आहे. मराठी राज्याचा प्रतिनिधी मराठी भाषकांपेक्षा वेगळी भूमिका मांडत असेल, तर राज्यकर्त्यांनी गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. नको त्या गोष्टी चालू देऊ नयेत, असा परखड सल्ला राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पवार यांची प्रकट मुलाखत झाली. माजी संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. जनार्दन वाघमारे यांनी विविध प्रश्न विचारून पवारांना बोलते केले. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी अलीकडेच स्वतंत्र विदर्भाची वकालत करणारे विधान करून विदर्भ स्वतंत्र झाला तर पश्चिम महाराष्ट्र कंगाल होईल, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याकडे मुलाखतकर्त्यांनी लक्ष वेधत स्वतंत्र विदर्भाबाबत मत विचारले असता पवार म्हणाले, स्वतंत्र विदर्भाची मागणी ही काही घटकांची असून, तो प्रामुख्याने अमराठी असल्याचे दिसते. पूर्वी हा भाग मध्य प्रांताचा हिस्सा होता व तेथे हिंदीचा प्रभाव होता. नागपूर ही राजधानीच होती. अनेकदा आम्हाला तेथे हिंदीतून भाषण द्यावे लागते. विदर्भातील बहुसंख्याक सामान्य माणूस मराठी भाषकच आहे. म्हणूनच वेगळा विदर्भाचा प्रश्न घेऊन गेलेल्यांना तेथे निवडणुकीत यश मिळालेले नाही. विदर्भ व मराठवाड्यात विकासाबाबत अस्वस्थता असली, तरी विचाराने हे दोन्ही भाग मराठी भाषेशी समरस झाले आहेत. अ‍ॅडव्होकेट जनरल हा शासनाचा, राज्याचा प्रतिनिधी आहे. मराठी राज्याचा प्रतिनिधी मराठी भाषिकांपेक्षा वेगळी भूमिका मांडत असेल, तर राज्यकर्त्यांनी गांभीर्याने नोंद घ्यायला हवी, असा सल्लाही पवार यांनी सरकारला दिला. (प्रतिनिधी)बेळगाव वा सीमाभागातून सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचेच उमेदवार निवडून येत असतात. मग भले हा भाग कर्नाटककडे असेल. मुळात सीमा भागातील जनतेची मानसिकता ही मराठी वा महाराष्ट्रवादीच आहे.