शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

विधानपरिषद निवडणुकीतील ‘व्यवहार’ आयोगाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 07:52 IST

विधान परिषदेच्या येत्या १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत अनेक ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याची खबर मिळताच

यदु जोशी / मुंबई विधान परिषदेच्या येत्या १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत अनेक ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होत असल्याची खबर मिळताच केंद्रीय निवडणूक आयोगाने या व्यवहारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी ही निवडणूक होत असून, बहुतेक उमेदवार कोट्यधीश आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या आर्थिक उलाढालींची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून, आपल्या मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास सतर्क केले आहे. या निवडणुकीत खर्चाची मर्यादा नसल्याचे कारण देत केंद्रीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत या निवडणुकीतील उधळपट्टीबाबत कानावर हात ठेवले होते. मात्र आता तपासाची अख्खी यंत्रणा कामाला लावली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्थानिक जिल्हाधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात टीम तयार केल्या आहेत. या निवडणुकीत मतदार असलेले जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकांचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती यांच्या तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या बँक खात्यांवर, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली. या निवडणुकीतील मतदारांची बँक खात्यांवर केवळ निवडणुकीपुरतीच नव्हे तर त्यानंतर जवळपास एक वर्ष किंवा गरज भासल्यास त्याहून अधिक काळ गुप्त नजर ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या निवडणुकीत दोन मतदारसंघांमध्ये बाहेरून गेलेले दोन उमेदवारही तपासाच्या रडारवर आहेत. या शिवाय, काँग्रेसच्या एका बड्या नेत्यांच्या उमेदवार बंधुंच्या आर्थिक हालचाली तपासल्या जात आहेत.