शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- पोलीस स्टेशनमध्ये भरते तरुणांची शाळा !

By admin | Updated: February 8, 2017 19:13 IST

ऑनलाइन लोकमत/गणेश मापारी मूर्तिजापूर, दि. 8 - पोलीस भरतीसोबतच सैन्यदल, नौदल, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस आदी भरती प्रक्रियेसाठी ग्रामीण भागातील ...

ऑनलाइन लोकमत/गणेश मापारी मूर्तिजापूर, दि. 8 - पोलीस भरतीसोबतच सैन्यदल, नौदल, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस आदी भरती प्रक्रियेसाठी ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना तयार करण्याचे काम मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी हाती घेतले आहे. यासाठी आठवड्यात दोन दिवस युवकांची शाळा पोलीस स्टेशनच्या आवारातच भरविली जात असून, ग्रामीण भागातील युवकांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींनी पोलीस दलासोबतच इतर भरतींसाठी सक्षम व्हावे, यासाठी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी युवक-युवतींची भरतीपूर्व सराव परीक्षा घेण्याचे नियोजन केले. गत तीन आठवड्यापासून सुरू केलेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातील युवक-युवतींचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सराव परीक्षेसाठी पोलीस स्टेशनमध्ये भरविण्यात येणाऱ्या शाळेत युवकांची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे सराव परीक्षेसोबतच मैदानावरील चाचण्यांबाबतही युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मंगळवारी ६५ युवकांनी हजेरी लावली असून त्यांच्याकडून भूगोल या विषयाची सराव परीक्षा घेण्यात आली. यानंतर अंतगणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास करवून नंतर युवकांची सराव परीक्षा घेतली जाणार आहे.लेखन सामग्री, नोट्स मोफतग्रामीण भागातील तरुण बेरोजगार राहिल्याने वाईट मार्गाला लागतात. त्यामुळे त्यांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. विशेष म्हणजे सराव परीक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या विविध विषयाच्या नोट्स तसेच लेखन सामग्रीही मोफत दिली जात असल्याने ठाणेदारांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींचा पोलीस दलातील टक्का वाढावा, त्यांना भरती प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम सुरू केला आहे. दिवसेदिवस युवकांचा प्रतिसाद वाढत असल्याने समाधान मिळत आहे.नितीन पाटीलसहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, मूर्तिजापूर (ग्रामीण)

https://www.dailymotion.com/video/x844qrh