ऑनलाइन लोकमत
वाकड, दि.29 - ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचा धाकटा मुलगा संगीत दाते यांच्या नशिबी आलेले रस्त्यावरील जीणं यावर ‘लोकमत’ने सर्व प्रथम प्रकाश टाकला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी संगीत यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्याबरोबर दिवसभर त्यांच्यावर विविध क्षेत्रतून मदतीसाठी अनेक हात पुढे आले.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्यास शिकविणारे अरुण दाते यांच्या संगीतला कोणीतरी वाकडच्या पुलाजवळ सोडले होते. पत्नीचा घटस्फोट व कुटुंबियांने ङिाडकारल्याने त्यांच्यावर भिकारी जीणो जगण्याची वेळ आली. अनेक व्याधींनी ग्रासले असून, त्यांना अर्धांगवायू झाला आहे. त्याविषयीचे वृत्त लोकमतमध्ये सोमवारी प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंजवडी ठाण्याचे उप निरीक्षक अमोल धस आणि त्यांच्या कर्मचा:यांनी संगीत यांना तातडीने औंध रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक 14 मध्ये संगीत यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी दाते यांच्याभोवती गराडा घातला. सोमवारी दिवसभर वृत्तवाहिन्यांवरून संगीत यांची मुलाखत दाखविण्यात येत होती.
हृदयनाथ मंगेशकर झाले व्यथित
पंडित हृदयनाथ मंगेशकर हे ‘लोकमत’ची बातमी वाचून व्यथीत झाले. त्यांनी तात्काळ संगीतकार सलील कुलकर्णी यांना दूरध्वनीवरून संगीत दाते यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल कारण्यास सांगितले आहे. त्यानुसार मंगेशकर रुग्णालयाचे पथक त्यांना घेण्यासाठी आले होते.
राज, उद्धव यांनी मदत करावी
संगीत दाते यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना कविवर्य मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे आणि अरुण दाते यांच्या अनेक रचना तयार करतानाच्या आठवणी सांगितल्या. तर मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या अतिशय जवळ असलेल्या संगीत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशीही सलोख्याचे संबंध असल्याचे सांगितले. तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे थोडेशे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.