शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : तरुणींचा कुस्तीकडे वाढलाय कल

By admin | Updated: January 10, 2017 16:11 IST

आळंदीच्या तालमीत तरूणी करताहेत 'दंगल'चा सराव    ऑनलाइन लोकमत   पिंपरी -चिंचवड, दि. १० -  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ...

आळंदीच्या तालमीत तरूणी करताहेत 'दंगल'चा सराव 
 
ऑनलाइन लोकमत
 
पिंपरी -चिंचवड, दि. १० -  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात विशेष कामगिरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन पिंपरी, चिंचवड, भोसरी व आळंदी परिसरातील मुलींनी स्वत:ला खेळात झोकून दिले आहे. कुस्ती, कबड्डी, हॉकी, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स अशा विविध खेळ प्रकारांत मैदान गाजविणारया महिला खेळाडूंचा आदर्श घेऊन तरुणींचा खेळाकडे कल वाढला आहे. आळंदीच्या तालमीत कुस्तीच्या सरावासाठी येणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे. पाच वर्षापुर्वी तालमीत सराव करणाऱ्या अवघ्या तीन मुलींची संख्या सध्या ४५ च्या घरात गेली आहे. 
 
आॅलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणाऱ्या अनिसा सय्यद,अंजली भागवत, राही सरनोबत यांच्यासह आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली तळेगावची हर्षदा जाधव, आंतरराष्ट्रीय धावपटू भाग्यश्री बिले यांचा आदर्श बाळगून मुलींचा खेळाकडे ओढा वाढला आहे. कबड्डीत बाजी मारलेल्या दीप्ती जोसेफ, तसेच आशियाई स्पर्धेत कुस्तीत सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली वडमुखवाडीची अंकिता गुंड अशा खेळाडूंमुळे पुणे जिल्ह्यातील तरुणींना खेळाबद्दलचे आकर्षण निर्माण झाले आहे. कुस्तीसारख्या मर्दानी खेळात महिलाही कमी नाहीत, हे हरियाणातील गीता फोगट आणि बबिताकुमारी या भगिनींनी पटकाविलेल्या पदकांनी सिद्ध केले. त्यावर दंगल चित्रपट आला आहे.  त्यामुळे तरुणींचा कल कुस्ती खेळसाकडे वाढला आहे. आता पालकही मुलींना खेळाबद्दल प्रोत्साहन देऊ लागले आहेत. असा सकारात्मक बदल घडून येत असल्याचा अनुभव आळंदीतील तालमीत मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देणाऱ्या दिनेश गुंड यांनी व्यक्त केला. 
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844nss