शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- पथकाने जागल करून ठेवला उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर 'वॉच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 17:59 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 27 - जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता मिशनअंतर्गत गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. तरीही हागणदारी कमी ...

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 27 - जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता मिशनअंतर्गत गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. तरीही हागणदारी कमी होत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी आता स्वच्छता पथकेच गावात मुक्कामी ठेवण्यास सुरुवात केली आहे. पथकाच्या वतीने रात्रभर शेकोट्या पेटवून जागल करून उघडयावर शौचास जाणाऱ्यांवर वॉच ठेवत असल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची मोठी पंचायत झाली असल्याचे कारंजा तालुक्यातील पारवा येथे दिसून आले. उघड्यावरील शौचालयाने होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृती करूनही काही ग्रामस्थ शौचालय बांधकामास बगल देत आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गुडमॉर्निंग पथकासह जिल्हा परिषदेच्या दोन सल्लागारांसह तालुका समन्वयकाची नियुक्ती करून त्यांना गावोगावी मुक्कामी ठेवण्याचा निर्णय मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी घेतला. अनेक गावांमध्ये आता 31 डिसेंबरपर्यंत पथक गावात ठिय्या देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना मज्जाव करणार आहे. यामुळे गावातील ज्या नागरिकांकडे शौचालय नाही त्यांची चांगलीच पंचाईत झाली.रात्रभर पथकाने दिला गावात पहाराकारंजा तालुक्यातील पारवा येथे पथक रात्री मुक्कामी थांबली असताना त्यांनी वेळोवेळी हागणदारीच्या ठिकाणी भेटी देऊन कलापथकाच्या वतीने जनजागृतीपर गीते गायलीत. तसेच भोंग्याद्वारे उघडयावर शौचास न जाण्याचे आवाहन केले. रात्रभर गावात शेकोट्या पेटवून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर वॉच ठेवला.

https://www.dailymotion.com/video/x844mkt