शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

VIDEO : नगर पाठोपाठ नाशिकमध्ये मराठा समाजाचा 'विराट' मोर्चा

By admin | Updated: September 24, 2016 14:01 IST

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर आज नाशिकमध्ये मराठ्यांचा आवाज घुमणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २४ - कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवितानाच अन्य मागण्यांसाठी आयोजित मराठा क्रांती मोर्चास तपोवन येथून प्रारंभ झाला आहे.  महिला आणि तरुणींचा लक्षणीय सहभाग असलेल्या या मोर्चासाठी जिल्ह्यातून लाखो मराठा नागरीक एकवटले असून या मराठा महासागराने कुंभ मेळ्यातील गर्दीच्या नाशिककरांच्या आठवणी जाग्या करून दिल्या आहेत. 
 
मोर्चाच्या प्रारंभी सुसज्जित वाहनावर शिव प्रभूंचा पुतळा त्या पाठीमागे अश्वारूढ शिवराय असून शिवबा व जिजाऊंच्या वेशभूषेत मुले आणि मुली आहेत. लाखोंच्या संख्येने जनसागर लोटला असून विविध राजकीय पक्षांचे नेते, शहराध्यक्ष , आमदार आदी सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून कार्य करताना दिसत आहेत. तपोवन येथे शिव प्रभूंना वंदन करून मोर्चा मार्गस्थ झाला असला तरी औरंगाबाद महा मार्गावर विंचुर, धुळे मार्गावर ओझर , चांदवड, सापुतारा मार्गावर दिंडोरी , पुणे महा मार्गावर शिंदे - पळसे तर मुंबई महा मार्गावर घोटी पर्यंत वाहतूक खोळंबली असून हजारो मोर्चेकरी रस्त्यात अडकून पडले आहेत. 
 
त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ मधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, शाळकरी विद्यार्थी, वकील, डॉक्टर्स अभियंते, साहित्यिक असे समाजातील सर्व घटक मोर्चात सहभागी झाले आहेत. राजकीय नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांनी मोर्चाची सूत्रे हाती घेतली असून हा मोर्चा पंचवटी , रविवार कारंजा, एम जी रोड सीबीएस मार्गे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पोहोचणार असून तेथे मराठा पंचकन्या निवेदनचे वाचन करून ते जिल्हाधिकाऱ्यांना देतील. मोर्चाचा संपूर्ण मार्ग मराठा बांधवांनी ओसंडून वाहत असून संपूर्ण शहर भगवेमय होत गर्दीने फुलून गेले आहे. दरम्यान महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले मोर्चात सहभागी झाली असून त्या मुलांनी कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून टक्कल केले आहे.