शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - हत्याराने भरलेले वाहन थेट मतदान केंद्रावर

By admin | Updated: February 21, 2017 19:56 IST

ऑनलाइन लोकमत पिंपरी, दि. 21 : मतदानाचा कालावधी साडेपाचला संपणार परंतू दहा मिनिटांचा कालावधी उरला असताना, नेहरूनगर येथील  क्रांती ...

ऑनलाइन लोकमतपिंपरी, दि. 21 : मतदानाचा कालावधी साडेपाचला संपणार परंतू दहा मिनिटांचा कालावधी उरला असताना, नेहरूनगर येथील  क्रांती चौकात  हत्याराने भरलेले वाहन दाखल झाले. या वाहनातुन आलेल्या टोळक्याने मतदारांपैकी एका दांपत्याला अडवले. आम्हालाच मतदान करा. लक्षात ठेवा, असे धमकावले. आम्ही आताच मत देऊन आलो आहोत,कोणाला मतदान करायचे हा आमचा अधिकार असून तो अधिकार आम्ही वापरला आहे. असे त्या दांपत्याने सांगताच वाहनातुन उतरून दोन तीन जणांनी यमन्नप्पा वीटकर यांच्यावर हल्ला केला. महिलेला ढकलून दिले. वाहनात बसलेल्या एकाने बाहेर येऊन यमन्नप्पाच्या हातावर तलवारीने वार केले. यमन्नप्पा जखमी होताच, जमाव जमला, संतप्त जमावाने वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे या भागात तणावाची परिस्थिती उद्भवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहन ताब्यात घेतले. मतदान करून आल्यानंतर भर चौकात टोळक्याने केलेल्या हल्यात पती यमन्नप्पा जखमी झाले. या प्रकरणी वनिता वीटकर (वय ३५,नेहरूनगर) यांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. तुम्ही आम्हालाच मतदान केले पाहिजे. असे धमकावुन एक प्रकारे दहशत माजविण्याचा प्रकार केला. असे वनिता वीटकर यांचे म्हणणे आहे. सामान्य माणसाने मतदान करायचे की नाही. माझे पती थोडक्यात बचावले. काय झाल असते, हे सांगता यत नाही. एम एच १४ इपी ९६६६ या क्रमांकाच्या वाहनातुन हल्लेखोर आले होते. या वाहनाच्या नंबरप्लेटवर कमळाचे स्टिकर आहे. असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी उपचारासाठी यमन्नप्पा यांना वायसीएम रूग्णालयात पाठवले. फिर्याद दाखल झाली तरी गुन्हा दाखल करण्याचे काम मात्र रात्री उशीरापर्यंत सुरू होते.मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसच्या उमेदवारावर हल्ला होण्याची घटना प्रभाग ९ मध्ये घडली होती. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ ब मधील कॉँग्रेसचे उमेदवार किरण अर्जुन पवार (वय ३१,रा.नेहरूनगर पिंपरी) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. डोक्यात वार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी चपळाईने वार चुकविला. हाताला जखम झाली.  सोमवारी रात्री ही घडलेली ही घटना ताजी असताना, मतदानाच्या दिवशी मंगळवारी भरदिवसा नंग्या तलवारी घेऊन आलेल्या टोळक्याच्या हल्लयात एक जखमी झाला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. https://www.dailymotion.com/video/x844sdn