शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

VIDEO- केमिकल वाहून नेणारा ट्रक अपघातानंतर आगीच्या विळख्यात

By admin | Updated: December 30, 2016 22:02 IST

ऑनलाइन लोकमत अमरावती, दि. 30 - बडनेरालगतच्या लोणी टाकळी गावाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत ...

ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 30 - बडनेरालगतच्या लोणी टाकळी गावाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन ट्रकमध्ये झालेल्या धडकेत केमिकल असलेल्या ट्रकला आग लागली. या आगीत या ट्रकचे चालक-वाहक ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त असून त्याला पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही. घटनास्थळी केमिकलमुळे आग भडकली असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. घटनास्थळावर आगीचे मोठमोठे लोळ उठत आहे. शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर अमरावती-अकोला राज्य महामार्गावर असलेल्या लोणी टाकळी गावातील चौकामध्ये ही आग लागली आहे. आगीमुळे दोन्ही दिशेची वाहतूक सुमारे पाच किलोमीटरच्या अलिकडे थांबविण्यात आली आहे. अमरावती येथून अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली असून, लोणी पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातानंतर सिलिंडरच्या ट्रकला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अमरावती महापालिकेच्या अग्निशमन दलाचे फायरमन चौखंडे, उताणे, पालने, इंगोले, सुर्यवंशी, पंधरे, गजभार, वाहन चालक पंधरे, सारीक अहमद, काकडे यांचे पथक आग विझविण्यासाठी गेले आहे. अमरावती व्यतिरिक्त बडनेरा, नांदगाव खंडेश्वर आदी ठिकाणच्या दहावर गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहे.

https://www.dailymotion.com/video/x844mwo