शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- बैल नसल्याने आता पोळ्याला ट्रॅक्टरांची मिरवणूक

By admin | Updated: September 1, 2016 19:51 IST

पोळ्याला जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी बैलाऐवजी मिनी ट्रॅक्टर सजवून त्यांच्या मिरवणुका काढल्या.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 1 - जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न व अनेक अडचणींमुळे शेतकरी बैलांऐवजी मिनी ट्रॅक्टरने शेतीची मशागत करीत असल्याने पोळ्याला जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी बैलाऐवजी मिनी ट्रॅक्टर सजवून त्यांच्या मिरवणुका काढल्या.चारा महागल्याने शिवाय आधुनिक शेतीचा वेध लागल्याने बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरने शेतीची मशागती करतात. कापूस, ऊस, केळी या पिकांची मशागत ट्रॅक्टरने होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांशी मैत्री तोडली आहे. परंतु पोळा आला की या शेतकऱ्यांना बैलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मातीपासून बनविलेल्या बैलांचे पूजन करून ट्रॅक्टरला सजवतात आणि या ट्रॅक्टर्सची मिरवणूक काढतात. गुरुवारी पोळ्यानिमित्ताने सायंकाळी बोरद, रांझणी ता.तळोदा, कोळदा, आष्टे ता.नंदुरबार या गावांसह इतर गावांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टर्सच्या मिरवणुका काढल्या. कोळदा गावात वाजंत्रीसह ट्रॅक्टरची मिरवणूक निघाली होती तर बोरद गावातही अनेक ट्रॅक्टर्सच्या मिरवणुका निघाल्या. दरम्यान, पोळ्यानिमित्त बहुतांश गावांमध्ये बैलांना सजवून त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.