शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - सुर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 21:22 IST

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 10 - करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुस-या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. महाद्वारपासून ...

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 10 - करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुस-या दिवशी सुर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. महाद्वारपासून प्रवास करत किरणांनी ५ वाजून ४९ मिनिटांना अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत येवून लुप्त झाली. आज किरणोत्सवाचा अखेरचा दिवस असून सुर्यकिरणांची तीव्रता चांगली राहिली तर किरणे मूर्तीच्या चेह-यावर येवून किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता होती.
अंबाबाईच्या किरणोत्सवाला बुधवारपासून सुरवात झाली. मात्र लिप इअर असेल तेंव्हा किरणोत्सव ८ नोव्हेंबरपासून सुरु होतो. त्यानुसार मंगळवारी किरणे अंबाबाई मूर्तीच्या चरणापर्यंत बुधवारी कमरेपर्यंत आणि गुरुवारी गळ्यापर्यंत आली. 
गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी सुर्यास्त होता. ४ वाजून ४८ मिनिटांनी महाद्वार रोडपासून सुरु झालेला किरणांचा प्रवास ५ वाजून ४९ मिनिटांनी अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत येवून पुर्ण झाला. त्यानंतर किरणांची तीव्रता कमी होवून ती लुप्त झाली. यावेळी सुर्यकिरणांची तीव्रता १५ लक्स इतकी होती.  गुरुवारी सुर्यकिरणांची तीव्रता चांगली होती. आकाश स्वच्छ आणि निरभ्र होते. ही तीव्रता आज देखील अशीच राहिली तर किरणे अंबाबाई मूर्तीच्या चेह-यावर पडून किरणोत्सव पूर्ण होवू शकेल अशी माहिती प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली.
 
किरणांचा प्रवास असा..
४ वाजून ४८ मिनिटे : महाद्वार 
५ वाजून ८ मिनिटे : गरुड मंडप
५ वाजून ३३ मिनिटे : पितळी उंबरा
५ वाजून ३६ मिनिटे : खजिना चौक
५ वाजून ३९ मिनिटे : पहिली पायरी
५ वाजून ४० मिनिटे : दुसरी पायरी
५ वाजून ४२ मिनिटे : तिसरी पायरी
५ वाजून ४५ मिनिटे : अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श
५ वाजून ४६ मिनिटे : कमरेपर्यंत 
५ वाजून ४८ मिनिटे : मूर्तीच्या छातीपर्यंत 
५ वाजून ४९ मिनिटे : अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत 
 
२ मिनिटे वाढायला हवी  
सुर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहºयावर येण्यासाठी आणखी दोन मिनिटांचा कालावधी मिळणे गरजेचे आहे. सुर्यकिरणांची तीव्रता कमी असली तरी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होण्यासाठी किरणांच्या मार्गातील अडथळे काढणे गरजेचे आहे.
प्रा. किशोर हिरासकर
https://www.dailymotion.com/video/x844hk7