ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 16 - जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा येथे रविवार, १५ आॅगस्ट रोजी येथे पर्यटकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अनेक पर्यटकांनी जिवघेणी कसरत करुन आपला जिव धोक्यात टाकल्याचे चित्र दिसून आले. एका युवकाने तर चक्क दरीत कोसळलेला मोबाईल काढण्यासाठी जीव टांगणीला बांधला होता.चिखलदरा येथे प्रसिध्द देवी पॉर्इंट आहे. या देवी पार्इंटवर चिखलदऱ्यामध्ये येणारा प्रत्येक जण दर्शनासाठी जात असल्याने येथे मोठया प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. देवी पार्इंटच्या बाजुला मोठी दरी आहे. या दरीचा फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरता आवरत नाही. त्यातच एका महिलेचा मोबाईल दरीमध्ये पडला. तेथे असलेल्या युवकाने हिरोगिरी करीत चक्क दोन महिलांची ओढणी एकाला एक बांधून दरीत उतरला. ओढणीची गाठ सुटली असती किंवा ती फाटली असती तर मोठा अनर्थ घडला असता परंतु याची काळजी न करता त्याने सिनेस्टाईल मोबाईल दरीतून काढला. यावेळी अनेकांनी टाळ्या वाजविल्या खरे. परंतु अनेकांनी जीवापेक्षा मोबाईल मोठा आहे का, अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्यात.
VIDEO- दरीत कोसळलेला मोबाईल काढण्यासाठी जिवाची बाजी
By admin | Updated: August 16, 2016 22:12 IST