शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

VIDEO- विद्यार्थ्यांचा शाळेसाठी नावेतून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 12, 2016 19:06 IST

५० हून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एक हजार फुटांहून अधिक रूंद असलेल्या अडाण नदीपात्रात डोंग्यात बसून जीवघेणा प्रवास करीत आहेत

नरेश आसावा/ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 12 - राहत्या गावात अपुऱ्या शिक्षण सुविधांसह बाहेर गावात जाण्यासाठी मजबूत दळणवळण व्यवस्थेच्या अभावामुळे ५० हून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एक हजार फुटांहून अधिक रूंद असलेल्या अडाण नदीपात्रात डोंग्यात बसून जीवघेणा प्रवास करीत आहेत. ही भीषण स्थिती आहे वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोळा या पुनर्वसित गावातील.अडाण नदी ही जिल्ह्यातील मोठ्या नंद्यापैकी एक असून, तिचे पात्र जवळपास एक हजार फुट आहे. आता याच नदीवर वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर मानोरा तालुक्यात १९७२ मध्ये एका भव्य प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आणि या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित करताना मानोरा तालुक्यातील म्हसणी, तोरणाळा, घोटी आणि जामदरा, तर कारंजा तालुक्यातील दिघी आणि वाघोळा या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. या गावांचे पुनर्वसन करताना मात्र शासनाने ग्रामस्थांसाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा ४५ वर्षांतही उपलब्ध केल्या नाहीत. परिणामी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. त्यांना उपलब्ध नसलेल्या मुख्य सुविधांमध्ये दळणवळणाची मजबूत व्यवस्था आणि शिक्षण, आरोग्य या सुविधांचा समावेश आहे. त्यातच वाघोळा गावातील आबालवृद्धांना तर या सुविधांचा अभावामुळे अनेक भीषण समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पुरेशी आरोग्य आणि शिक्षण सुविधा नसल्यामुळे, पावसाळ्याच्या दिवसांत तर त्यांची परिस्थिती अधिकच भीषण होते. नदीचे पात्र काठोकाठ भरल्यामुळे येथील लोकांना कारंजा किंवा नजिकच्या इंझोरी येथे जाण्यासाठी डोंग्यातून प्रवास करावा लागतो. गर्भवती स्त्रिया आणि विद्यार्थ्यांना यासाठी जीवच धोक्यात घालून वेळोवेळी डोंग्यात बसून जावे लागते. वाघोळा येथील ५७ विद्यार्थी इंझोरी येथे, तर एवढेच कारंजा येथे शिक्षण घेतात.

वाघोळा येथे ८ व्या वर्गापर्यंतचेच शिक्षण असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे किंवा कारंजा येथून येजा करावी लागते. या सर्वांना कारंजा किवा इंझोरी येथे जाण्यासाठी नदीपात्रातून जावे लागते; परंतु हा प्रवास करण्यासाठी नदीवर पुल नाही. त्यामुळे शाळेत जाताना आणि येतानाही डोंग्यात बसून जीव धोक्यात घालून जावे लागते. नाही म्हणायला येथील विद्यार्थ्यांना इंझोरी येथे जाण्यासाठी एक चार किलोमीटर अंतराचा रस्ता आहे; परंतु त्या रस्त्याची अवस्थाही एवढी दयनीय आहे, की थोडाही पाऊस आला की त्या रस्त्यावर चिखल तयार होऊन पायी चालणेही कठीण होते. मग येथून सायकल किंवा ईतर वाहन न्यावे तरी कसे हा प्रश्न निर्माण होतो. पाऊस थांबल्यानंतर रस्ता सुरळीत होण्याची प्रतिक्षा अनेकदा विद्यार्थ्यांना करावी लागते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. अशात शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल आणि शाळेत नियमित जायचे असेल, तर येथील विद्यार्थ्यांना सकाळ, सांयकाळ डोंग्यातूनच जीव धोक्यात घालत प्रवास करावा लागतो. एखादवेळी अनर्थ झाला, तर चिमुकल्यांची मोठ्या प्रमाणात प्राणहानी होण्याची शक्यता आहे.