शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : तारे जमी पर... चिमुकल्यांनी घडविले ऋषभराज

By admin | Updated: August 31, 2016 17:43 IST

अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त तसेच पोळा सणाच्या पृष्ठभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी शिव हेल्थ क्लबचे शिवा मोहोड यांच्या संकल्पनेतून मातीपासून बैल बनविण्याची

- सचिन राऊत/ प्रविण ठाकरे

अकोला, दि. 31- अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त तसेच पोळा सणाच्या पृष्ठभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी शिव हेल्थ क्लबचे शिवा मोहोड यांच्या संकल्पनेतून मातीपासून बैल बनविण्याची भव्य स्पर्धा बुधवारी घेण्यात आली. रिमझीम पावसात शेकडो मुलांनी  तुकाराम चौकामध्ये मातीपासुन बैल बनविण्यासाठी गर्दी केली होती. तंत्रज्ञानाकडे वळलेल्या मुलांना आपल्या संस्कृती व परंपरेची माहिती व्हावी, या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. 

भारत देश कृषिप्रधान असून, शेतात बळीराजासोबतच रात्रं-दिवस राबणा-या बैलांविषयी माहिती शहरी मुलांना व्हावी, त्यांना शेतीविषयक कामांची माहिती व्हावी, बैलांविषयीच नव्हे तर गोवंशाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने शिव हेल्थ क्बलच्यावतीने शालेय मुलांसाठी मातीपासून बैल बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शालेय विद्यार्थी स्पर्धकांना मोफत प्रवेश देण्यात आला असून शेकडो विद्यार्थी मातीपासुन बैल बनविण्यात रमले होते. वर्ग १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम बक्षीस तीन हजार रुपये, द्वितीय बक्षीस दोन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस एक हजार रुपये रोख देण्यात आले. यासोबतच वर्ग ६ वी ते १० वीच्या वयोगटासाठी प्रथम बक्षीस एक हजार रुपये, द्वितीय बक्षीस ७०० रुपये, तृतीय बक्षीस ५०० रुपये देण्यात आले. यासोबतच खुल्या गटासाठी प्रथम बक्षीस एक हजार, द्वितीय बक्षीस ७०० रुपये आणि तृतीय बक्षीस ५०० रुपये देण्यात आले. मातीचे बैल बनविण्यासाठी स्पर्धकांनी प्रचंड गर्दी केली होती. शिव हेल्थ क्लबचे शिवा मोहोड यांनी राबविलेल्या या अनोख्या स्पर्धेत लहाण मुले ‘तारे जमीं पर’ चित्रपटातील एका दृष्याप्रमाणेच बैल तयार झाल्यानंतर त्यांना रंगवितांना दिसली.