शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वृद्धेला लुटणारा समोसा गजाआड

By admin | Updated: August 13, 2016 04:16 IST

देवदर्शनाला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळालेल्या समोसाला शीव पोलिसांनी तब्बल २० दिवसांनंतर बिहार येथून अटक केली. जावेद मोहम्मद समशाद खान उर्फ

मुंबई : देवदर्शनाला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळालेल्या समोसाला शीव पोलिसांनी तब्बल २० दिवसांनंतर बिहार येथून अटक केली. जावेद मोहम्मद समशाद खान उर्फ समोसा (२२) असे या आरोपीचे नाव असून, विशेष म्हणजे पाठमोऱ्या व्हिडीओ फुटेजच्या आधारावर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. शीव येथील जैन सोसायटीत चंद्राबेन प्रवीण मेहता (७३) या कुटुंबीयांसोबत राहतात. २४ जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास त्या मंदिराकडे निघाल्या. सोसायटीतूनच जात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांवरही दबाव वाढला होता. यामध्ये त्यांची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरीला गेली होती. शीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक येशुदास गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, अंमलदार सावंत, पाटील, सोनावणे यांच्या पथकाने तपास केला.व्हिडीओमध्ये लुटारू पाठमोरा दिसत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, स्थानिकांची चौकशी केली. वृद्धेने केलेल्या वर्णनाच्या आधारे शोध घेतल्यानंतर तो समोसा असल्याचे समोर आले. गुप्त माहितीदारांच्या मदतीने तो धारावी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो बिहारला पळून गेला होता. गायकवाड यांचे तपास पथक बिहारला रवाना झाले. २० दिवसांनी पोलिसांनी समोसाला अटक केली. तो अभिलेखावरील आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा रहिवासी असलेला समोसा हा धारावी येथे आई आणि चार भावांसोबत राहतो. नशेच्या आहारी गेलेल्या समोसाला घरातूनही पैसे मिळणे बंद झाले होते. त्यामुळे नशेसाठी तो सोनसाखळी चोरी करू लागला होता. त्याच्याविरुद्ध अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)