शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

VIDEO : शोभायात्रेतून ‘डिजिटल इंडिया’चा नारा

By admin | Updated: February 10, 2017 23:42 IST

पारंपरिक वेशभूषेसह आपल्या राज्यातील वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरांचे दर्शन घडविणा-या कलाप्रकारांचे सादरीकरण, ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत, उत्साही वातावरणात शुक्रवारी

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 10 - पारंपरिक वेशभूषेसह आपल्या राज्यातील वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरांचे दर्शन घडविणा-या कलाप्रकारांचे सादरीकरण, ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत, उत्साही वातावरणात शुक्रवारी शोभायात्रेतून ‘शिवोत्सवा’स प्रारंभ झाला. यावेळी ‘कॅशलेस व्यवहार’ या विषयाभोवती गुंफलेल्या ‘शोभायात्रे’ने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.  
शोभायात्रेची सुरुवातप्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे यांच्या हस्ते ध्वज दाखवून झाली. यावेळी कु लसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आर. व्ही. गुरव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, एनएसएस विभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, ‘एआययू’चे सहसचिव डॉ. डेव्हिड सॅम्पसन, आदी उपस्थित होते.
महोत्सवासाठी देशभरातून आलेल्या विविध विद्यापीठांतील संघांनी दुपारी अडीच वाजल्यापासूनच शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ गटागटाने जमावयास सुरुवात केली होती. यावेळी श्री खंडोबा वेताळ तालीम मर्दानी खेळपथकाने शिवकालीन युद्धक लेचे दर्शन घडविले. तसेच सुहासराजे ठोंबरे यांनी पोवाड्यांचे सादरीकरण केले. शोभायात्रेच्या अग्रस्थानी विद्यापीठाचा ध्वज धारण करणारा अश्व आणि त्याच्यापाठोपाठ झांजपथक होते. त्यामागे शिवाजी विद्यापीठाचा कोल्हापूरची संस्कृती, कृषी व परंपरेचे दर्शन घडविणारा चित्ररथ होता. गतवर्र्षीच्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील विजेत्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या संघाला   अग्रस्थानाचा मान देण्यात आला. त्यापाठोपाठ अन्य विद्यापीठांचे संघ आणि सर्वांत शेवटी यजमान शिवाजी विद्यापीठाचा संघ होता.  यावेळी त्यांनी आपल्या संस्कृती, परंपरेसह विविध वाद्यांचे सादरीकरण केले. आसामच्या तेजपूर विद्यापीठाने आपल्या पर्यटन संस्कृतीचे दर्शन घडवीत पारंपरिकतेला कॅशलेस व्यवहाराची जोड देणारा देखावा सादर केला; तर जम्मू अ‍ॅँड काश्मीर विद्यापीठाने ‘नोटाबंदीतून नवा भारत घडेल,’ असा संदेश देणारी कलाकृती सादर केली. रांची विद्यापीठाने आपल्या वाद्य व नृत्यप्रकारांतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.   तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सीपीआर रुग्णालय यांच्यातर्फे एड्स जनजागृतीसाठी  प्रबोधन करणारा चित्ररथही यामध्ये सहभागी झाला होता. तसेच यावेळी त्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. शोभायात्रेचा मार्ग विद्यापीठाची मुख्य इमारत, मुलींचे वसतिगृह, सायबर चौक, माउली चौक, चांदीचा गणपतीचे मंदिर (शाहूनगर), प्रतिभानगर, मालती अपार्टमेंट, एनसीसी भवन ते लोककला केंद्र असा राहिला. दुपारची वेळ असूनही शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. देशभरातून आलेल्या युवा कलाकारांच्या संघाकडे कुतूहलाने पाहून ते कौतुकाची दाद देत होते