शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - वीज चोरीचे रिमोट विकणा-यासह खरेदीदारांचा भंडाफोड

By admin | Updated: July 15, 2017 18:22 IST

ऑनलाइन लोकमत औरंगाबाद, दि. 15 - चीनमधून आयात  रिमोट आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या आधारे वीज चोरी कशी करावी हे शिकविणा-या ...

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 15 - चीनमधून आयात  रिमोट आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसच्या आधारे वीज चोरी कशी करावी हे शिकविणा-या इलेक्ट्रीशियन तरूणाला पोलिसांनी अटक केली. वीजचोर ग्राहकांविरूद्ध गुन्हा नोंदविला,अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव आणि महावितरणचे सहव्यवस्थापकिय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
पोलीस आयुक्त म्हणाले की, वीज चोरीसाठी लोक वेगवेगळे फंडे वापरतात. पोलिसांच्या मदतीने महावितरणच्या अधिकाºयांनी संशयित वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी सुरू केली. या मोहिमेत काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करताना आढळले. काही ग्राहकांनी चक्क चायना मेड रिमोट कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसचा वापर करून वीज चोरी सुरू  केल्याचे समोर आले.  मयुरपार्क येथील एका बंगल्यात महावितरणचे अधिकारी  तपासणीसाठी गेले तेव्हा त्यांना तेथील मीटर बंद दिसले.  त्यांना संशय आला.  
 
रिडींग  घेण्यासाठी मीटर सुरू असणे आवश्यक असल्याचे अधिकाºयांनी घरातील  महिलेस सांगितले. तेव्हा त्यांनी रिमोट कं ट्रोल अधिकाºयांच्या हवाली केले आणि रिमोटचे बटन दाबून मीटर सुरू केले.  त्या ग्राहकांसह परिसरातील अनेकांनी अशा  रिमोटचा वापर करून वीज चोरी करीत असल्याचे आढळले. वीज ग्राहकांना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी किशोर रमेश राईकवार (रा. हर्सूल , मूळ रा. अमरावती) याने हे रिमोट कंट्रोल आणून दिल्याचे सांगितले. यांनतर पोलिसांनी किशोरला ताब्यात घेतले. 
 
यु ट्युबवरून तयार केल्या वीज चोरीच्या मॅग्नेटिक बॅट्स
पोलीस आयुक्त म्हणाले की, आरोपी हा दहावी पास आहे. तो इलेक्ट्रेशियन आहे. त्याने मीटरमध्ये फेरफार न करता वीज चोरी करावी, याची व्हिडिओ क्लीप  इंटरनेटवरील यु ट्युबवर पाहिली. या ट्युबमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याने मच्छर मारण्याच्या बॅटचा वापर करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीमुळे मीटर हँग होते. मीटर बंद होऊन वीज पुरवठा सुरू असल्याचे प्रात्यक्षिक ग्राहकांना दाखविले. त्यानंतर त्याने शेकडो ग्राहकांना अशा इलेक्ट्रो मॅग्नेटिक्स बॅटची विक्री केली.
https://www.dailymotion.com/video/x84580t