शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : महादेवाचा ठाव, धारगड त्याचे नाव!

By admin | Updated: August 20, 2016 17:15 IST

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या धारगडला गुफाजवळ दरवर्षी श्रावणातील तिस-या सोमवारी महादेवाची यात्रा भरते. त्यामुळे रविवारपासूनच शिवभक्त धारगडच्या वाटेला लागतात.

विजय शिंदे
ऑनलाइन लोकमत
आकोट, दि. २० - सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या धारगडला गुफाजवळ दरवर्षी श्रावणातील तिस-या सोमवारी महादेवाची यात्रा भरते. त्यामुळे रविवारपासूनच शिवभक्त धारगडच्या वाटेला लागतात. यात्रेकरिता दरवर्षी अकोल्यासह अमरावती, बुलडाणा, वाशिम या लगतच्या जिल्ह्यातील तसेच महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून शिवभक्त मोठ्या संख्येने येत असतात. अकोला जिल्ह्यातील आकोट शहरापासून उत्तरेस पाऊलवाटेने २५ कि.मी. तर वाहनाच्या रस्त्याने ४० कि.मी. अंतरावर धारगड आहे. पाऊलवाटेने जाण्यासाठी शिवभक्तांची पसंती अधिक आहे. हे शिवभक्त पूर्णा नदीतील जलाची कावड आपल्या खांद्यावर घेऊन हर हर महादेव, जय भोलेचा गजर करीत हिरवाईतून महादेवाची वाट काढत निघतात. पायदळ जाणारे शिवभक्त आकोटवरून बोर्डी, कासोद मार्गे आमोना, धारगड पाऊलवाटेने रात्रीच्या वेळी अंधारात जयभोलेचा गजर करीत मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे सातपुड्याच्या कडांमध्ये ‘जय भोले’चा आवाज गुंजत असतो. धारगड येथे पोहोचल्यानंतर प्रारंभी गडावरून नेहमी पाण्याची धार खाली कोसळत राहते. या धारेखाली भक्त स्रान करतात त्यानंतर सोमवारी गुहेमधील मोठ्या महादेवावर जलाभिषेक करतात. त्यातील काही शिवभक्त लहान महादेवावर जातात. नंतर तेथून शार्दूलबुवाची टेकडी चढून दुपारपर्यंत एकेरी रस्त्याने नरनाळा किल्ल्यावर पोहोचतात. हनुमानगड येथील भंडाºयाचा लाभ घेतात. किल्ल्यावरून शहानूर येथे खाली उतरतात. तर काही कुटूंब खटकाली मार्ग सोमवारी थेट आपल्या वाहनाने धारगडला जाऊन दर्शन घेऊन परत येतात. धारगड गुफेत असलेले भुयार नरनाळा किल्यावर निघते असे सांगण्यात येते. पंरतु सुरक्षेच्या दृष्टीने भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. आज हा परिसर व्याघ्र प्रकल्पात गेल्यामुळे राखीव वनक्षेत्र बनला आहे. त्यामुळे यात्रा महोत्सव वगळता वर्षभर या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे.