शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

VIDEO - शिवसेना खासदाराने विमान कर्मचाऱ्याला बदडले

By admin | Updated: March 24, 2017 07:35 IST

शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या ड्युटी मॅनेजरला चपलेने मारल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी दिल्लीत

नवी दिल्ली : शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या ड्युटी मॅनेजरला चपलेने मारल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी दिल्लीत घडला. आपण त्याला सँडलने २५ वेळा मारले, असे स्वत: गायकवाड यांनी सांगितले.खा. गायकवाड यांच्याविरुद्ध मारहाण केल्याचा आणि एअर इंडियाचे विमान तब्बल ४0 मिनिटे रोखून धरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी या प्रकाराबद्दल खा. गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. खा. रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनासाठी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट होते. पण आपणास इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आल्याची त्यांची तक्रार होती. मात्र या विमानात बिझनेस क्लास नाही आणि केवळ इकॉनॉमी क्लासच आहे, याची कल्पना खा. गायकवाड यांच्या कार्यालयाला देण्यात आली होती. विमानात आल्यानंतर आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली.विमान दिल्लीला उतरल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले. मात्र खा. गायकवाड विमानातून खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी खा. गायकवाड यांनी ६0 वर्षीय आर. सुकुमार या ड्युटी मॅनेजरला शिवीगाळ करीत सँडलने मारले. यासंदर्भात खा. गायकवाड म्हणाले की, मी तक्रार पुस्तिका मागितली, तेव्हा अरेरावी करीत संबंधित कर्मचारी माझ्या अंगावर धावून आला. आपण खासदार असल्याचे सांगितल्यावरही तो माझ्याशी उद्धटपणे बोलत राहिला. त्यामुळे त्याची कॉलर धरून मी त्याला मारले. मारहाणीत सुकुमार यांचा चश्माही तुटला. आपण भाजपचे नव्हे, शिवसेनेचे खासदार आहोत, असा अपमान मी सहन करणारच नाही, असेही खा. गायकवाड म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)शिवसेनेने मागितला खुलासाखा. गायकवाड यांच्याकडून खुलासा मागविला आहे. शिवसेनेला कोणत्याही प्रकारचा हिंसाचार मान्य नाही. एअर इंडियात शिवसेनेची कर्मचारी संघटना आहे. मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे म्हणणेही आम्ही युनियनमार्फत जाणून घेत आहोत.- हर्षल प्रधान, शिवसेना पक्षप्रमुखांचे प्रसिद्धी सल्लागारहे वर्तन अमान्यचपक्षातील कोणीही अशा प्रकारचे वर्तन करणे शिवसेनेला मान्य नाही. खासदार गायकवाड यांचा स्वभाव तापट नाही. त्यामुळे असे करणे त्यांना का भाग पडले हेही पाहायला हवे.- मनीषा कायंदे, प्रवक्त्या, शिवसेनासंसदेत विषय उपस्थित करणारहा फक्त शिवसेनेचा प्रश्न नाही. खासदार त्यांच्या हक्कांबद्दल एकजुटीने बोलतात, मग अशा वेळीही त्यांनी एकमुखाने बोलायला हवे. शिवाय सरकार कोणती भूमिका घेणार हे विमान वाहतूकमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवे. भाजपाच्याही अनेक खासदारांनी यापूर्वी असे वर्तन केले आहे. आम्ही हा विषय संसदेत उपस्थित करू.- प्रियंका चतुवर्दी, प्रवक्त्या, काँग्रेसजबाबदारीने वागावेखसदार म्हणून आम्ही सर्वांनीच अधिक जबाबदारीने वागायला हवे. माझ्या सहकारी खासदाराने काही चुकीचे वर्तन केले असेल तर त्याच्या वतीने इथे दिल्लीत बसलेल्या सर्वच खासदारांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी.- किरिट सोमय्या, खासदार, भाजपा