शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

VIDEO : पुण्यात स्कूल व्हॅनने घेतला पेट, विद्यार्थी थोडक्यात बचावले

By admin | Updated: October 6, 2016 15:45 IST

शाळेच्या मुलांना घरी सोडण्यासाठी जात असलेल्या स्कूल व्हॅनला अचानक आग लागल्याची दुर्घटना पुण्यात घडली.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ६ -  शाळेच्या मुलांना घरी सोडण्यासाठी जात असलेल्या स्कूल व्हॅनला अचानक आग लागली. या घटनेत स्कूल व्हॅन संपुर्णपणे जळून खाक झाली. चालक आणि नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान राखत गाडीमधील दहा मुलांना बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग विझवली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश खरकुडे हे त्यांची स्कूल व्हॅन घेऊन सकाळी साडेअकराच्या सुमारास खासगी शाळेतील मुलांना घरी सोडण्यासाठी जात होते. एरंडवण्याजवळील पटवर्धन बाग परिसरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ गाडीमधून अचानक धुर येऊ लागला. त्यांनी गाडी बाजुला उभी करताच गाडीने पेट घेतला. स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला धावले. खरकुडे आणि नागरिकांनी तातडीने गाडीतील 10 मुलांना विद्युत चपळाईने खाली उतरवत दुरवर नेले. काही क्षणातच गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. बघता बघता गाडी जळून खाक झाली. खरकुडे यांचा मोबाईलही या आगीत जळाला. 
दरम्यान, नागरिकांनी अग्निशामक दलाला फोन करुन आगीची माहिती दिली. माहिती मिळताच दलाचे तांडेल राजेंद्र पायगुडे, चालक सतिश जगताप, जवान राजेंद्र भिलारे, महेश देशमुख, विठ्ठल सावंत घटनास्थळी धावले. पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवले. मुलांना दुस-या वाहनामधून त्यांच्या घरी पाठवण्यात आले असून सर्व मुले सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेच्या निमित्ताने स्कूल व्हॅन्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.