शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : जिल्हा परिषदेच्या परिसरात भरली वारल्याची शाळा!

By admin | Updated: August 26, 2016 16:07 IST

रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी चक्क जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २६ -  इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या २०७ विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ ५ शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तथापि, रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी चक्क जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची शाळा २६ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान भरविण्यात आली. यासंदर्भात तालुक्यातील वारला येथील पालकांनी प्रशासनाला अवगत सुध्दा केले होते मात्र त्याची दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले. 
यासंदर्भात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि संतप्त ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाºयांची भेट घेवून यासंदर्भात गत आठ दिवसापूर्वी चर्चा घडवून आणली. वारला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्यानुसार, सद्य:स्थितीत एकंदरित २०७ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. असे असताना ८ शिक्षकांच्या मंजूर ८ पदांपैकी गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेवर केवळ ५ शिक्षक कार्यरत असून ३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 
परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या महत्वाच्या तथा गंभीर प्रश्नासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती, जिल्हाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदिंना वेळोवेळी अवगत केले. मात्र, त्याचा कुठलाच फायदा झाला झाला नसल्याने पालकांनी आपले विद्यार्थी जिल्हा परिषद आवारात आणून तेथेच शाळा भरविली.