शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - सावित्री नदीवरचा पूल गेला वाहून, दोन एसटी बससह काही वाहने बेपत्ता

By admin | Updated: August 3, 2016 16:16 IST

मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे.

ऑनलाइन लोकमत

महाड, दि. 3 - मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा  सावित्री नदीवरचा जुना पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्या पुलावरून जाणा-या राजापूर-बोरिवली आणि जयगड- मुंबई या दोन एसटी बससह 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेली आहेत. या दोन्ही एसटी बसमध्ये 22 प्रवासी होते.  सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हा पूल १०० वर्ष जुना असल्याची माहिती असून धोकादायक अवस्थेत हा पूल होता. 

(महाड पूल दुर्घटना - लोकमतने ३ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा)

(VIDEO : महाबळेश्वरमधल्या पावसामुळे महाडमधला पूल कोसळला)

  •  

मुंबई गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ असलेला हा पूल काल रात्री ११.३० च्या सुमारास वाहून गेला. हा पूल कमकुवत झाला होता. त्यामुळे पोलादपूर वरून महाड कडे येणारी 10 ते 15 वाहने पुलावरून नदीत कोसळली, आणि पुराच्या पाण्यात वाहून गेली असण्याची भिती व्यक्त होत आहे.  दरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी पुण्याहून एनडीआरएफचे बचाव पथक रवाना झाले आहेत. एनडीआरएफच्या टीम्स दाखल झाल्यानंतर ख-या अर्थाने बचावकार्य सुरु होईल. 

 

जयगड-मुंबई आणि राजापुर-मुंबई या दोन बसेसची नोंद पोलादपुर एसटी स्थानकातून पुढे रवाना अशी आहे; मात्र या दोन्ही बसेस अद्याप महाड बस स्थानकात पोहोचलेल्या नाहीत. यावरुनच त्या वाहून गेल्याचे सांगीतले जात आहे. या दोन बसेस बरोबर अन्य खाजगी वाहने नेमकी किती याचा आकडा अद्याप निश्चित होवू शकलेला नाही.

मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा हा पूलच वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे, अशी माहिती मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी घटनास्थळावरून दिली. अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू आॅपरेशन सुरू आहे. महाड आणि पोलादपूरला जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.

सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहनचालकांनी सहकार्य करण्याचं आवाहनही रायगड पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले असून, महाड-पोलादपूरला जोडणारा पूल वाहून गेल्याने रत्नागिरीहून वाहतूक कशेडी बायपास मार्गे वळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुरात 10 ते 15 गाड्या वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

काळोख असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहिती महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी दिली आहे. ते स्वतःच्या सहका-यांसह घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबवत आहेत. वाहतूक कधी सुरळीत होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शक्यतो प्रवाशांनी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणं टाळावं, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. 

रात्रीच्या अंधारात नेमकी किती जीवीतहानी झाली ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. प्रशासनाकडून जलदगतीने मदत आणि बचावकार्य सुरु राहील असे मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन सांगितले. 

 

There is no confirmed assessment about casualties since the area is very dark.Administration will ensure speedy rescue & relief operations.