शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

VIDEO- तासगावच्या रथोत्सवाला अलोट गर्दी

By admin | Updated: September 6, 2016 20:32 IST

तासगाव येथील गणपतीचा २३७वा ऐतिहासिक रथोत्सव मंगळवारी भाविकांच्या अलोट गर्दीत आणि उदंड उत्साहात पार पडला.

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 6 - मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात तासगावच्या ऐतिहासिक आणि प्रसिध्द गणपतीचा २३७ वा रथोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पाच तासांहून अधिक काळ सरू असलेल्या रथ यात्रेत राज्यभरातून आलेल्या भाविकांनी हजेरी लावली. गुलालाच्या उधळणीत रंगलेल्या भाविकांच्या उत्साहाचा भक्तीसागर सर्वांनी अनुभवला. 

तासगावचा उजव्या सोंडेचा गणपती राज्यासह देशभर प्रसिध्द आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्यामुळे इथल्या दीड दिवसाच्या गणपती विसर्जन आणि रथोत्सवात सहभागी होण्यासाठी सांगली जिल्ह्यासह राज्यभरातील गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली. गणपती पंचायतन व पटवर्धन संस्थानचा यंदाचा २३७ वा रथोत्सव होता. ९६ फूट उंच असणारे गोपुर, तीन मजली आणि तीस फूट उंचीचा, चारचाकी रथदेखील प्रसिध्द आहे. हा रथ गणेशभक्तांनी दोरखंडाच्या साहाय्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे. सार्वजनिक रथोत्सवाची सुरुवात तासगावचे परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सुरू केली. सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे. सामाजिक ऐक्याची प्रेरणा देणाऱ्या या उत्सवात रथ ओढण्यासाठी भाविकांत झुंबड उडाली होती. 

मंगळवारी सकाळी राजवाड्यात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्याहस्ते आरती झाली. दुपारी १२ वाजता वाद्यांच्या गजरात पालखीतून मातीच्या मूर्तीचे व ऐतिहासिक १२५ किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचे राजवाड्यात आगमन झाले. पालखीसमोर पारंपरिक गोंधळी, होलार व कैकाडी समाज मानाने वादन करीत होता, तर संस्थानची गौरी हत्तीण दिमाखात चालत होती. गणेशमूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा करण्यात आली. आरतीनंतर दोन्ही मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. संस्थानचा रथ केळीचे खुंट, फुलांच्या माळा व नारळाच्या तोरणांनी सजवला होता. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती.रथासमोर अनेक झांजपथक व गोविंदा मंडळांनी आपल्या कला सादर करताना रथास मानवंदना दिली. मातीच्या व पंचधातूच्या मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्या. आरती म्हटल्यानंतर रथोत्सवास सुरुवात झाली. झांज पथकाचा ठेका, मोरयाऽऽ मोरयाऽऽ चा जयघोष व गुलाल, पेढ्यांच्या उधळणीत दुपारी १ वाजून २० मिनिटांनी रथ ओढण्यास सुरुवात झाली. रथ ओढताना रथातून भाविकांवर गुलालाची उधळण होत होती. तसेच पेढे, खोबरेही रथ ओढणाऱ्या भाविकांना दिले जात होते. गणपती मंदिरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ रथयात्रा पोहोचल्यानंतर, आरती करुन शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर रथाचा परतीचा प्रवास सुरु झाला. चार तासांच्या मिरवणुकीनंतर तासगावचा ऐतिहासिक २३७ वा रथोत्सव शांततेत पार पडला.