शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : खगोलप्रेमींनी अनुभवले एकत्रित सूर्य-चंद्रबिंबाचे दुर्मिळ दर्शन

By admin | Updated: February 10, 2017 23:11 IST

नव्याच्या पौर्णिमेला म्हणजे माघ पौणिैमेला शुक्रवारी सायंकाळी अवकाश निरिक्षकांनीआणि खगोलप्रेमींनी लालभडक सूर्य आणि चंद्रबिंबाचे एकाच वेळेस दर्शन घेण्याची दुर्मिळ

 
- संदीप आडनाईक/ऑनलाइन लोकमत
 
कोल्हापूर, दि. 10 -  नव्याच्या पौर्णिमेला म्हणजे माघ पौणिैमेला शुक्रवारी सायंकाळी अवकाश निरिक्षकांनीआणि खगोलप्रेमींनी लालभडक सूर्य आणि चंद्रबिंबाचे एकाच वेळेस दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी अनुभवली. पन्हाळा आणि मसाई पठारासारख्या उंचावरील जागेवर ही अनोखी वैज्ञानिक जादू पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली.
लोकमतच्या टीमने कोल्हापुरपासून तीस किलोमीटर अंतरावरील पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर या अनोख्या दर्शनाचा अनुभव घेतला. यावेळी मसाई पठाराच्या पश्चिम क्षितिजावर अगदी अल्पकाळ लालसर मोठे सूर्यबिंब आणि पूर्व क्षितिजावर तितकेच मोठेआणि लालसर चंद्रबिंब पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली. ठीक सहा वाजता चंद्रोदय झाला पण, धुक्याच्या दुलईमुळे जेव्हा दहा मिनिटांनी अगदी सूर्यास्त होण्याच्या एक-दोन मिनिटांनी म्हणजे सहा वाजून ११ मिनिटांनी चंद्र क्षितिजावर पूर्णरुपात अवतरताच हेअनोखेआणि विहंगम दृश्य ख़गोल प्रेमींना अनुभवाला मिळाले. 
विशेष म्हणजे केवळ डोळ्यांनी या माघ पौर्णिमेला सूर्यास्त आणि चंद्रोदय एकाच क्षितिजरेषेवर पहायला मिळाले. याशिवाय अवकाशात शुक्र आणि मंगळ हे दोन्ही ग्रहही साध्या डोळ्यांनी अतिशय स्वच्छ आणि स्पष्टपणे दिसले. 
पन्हाळा हे कोल्हापूरपेक्षा सातपटीने प्रदूषणमुक्त असल्यामुळे या परिसरातून अवकाश निरीक्षण करणे ही एक पर्वणी होती. दूरसंचारचे निवृत्त अधिकारी वसंतराव घोरपडे, विभागीय अभियंता व्ही. एस. कालुगडे, एस. एस. मुरगे, ए. बी. चौगुले, एम. एम. पुजारी, एस. पी. चव्हाण तसेच रोहित कांबळे, मगदूम यासारख्या स्थानिकांनीही मसाईवर हा अनुभव घेण्यासाठी ठाण मांडले होते. हौशी छायाचित्रकारांनीही ही संधी सोडली नाही. केआयटी कॉलेजचे प्रा. विवेक देसाई, प्रा. विदुला स्वामी तसेच शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. व्ही. जे. फुलारी आणि पीएचडीचे विद्यार्थीअविराज जत्राटकर, हौशी छायाचित्रकार सुनील साखरे यांनी पन्हाळ्यातील पुसाटी पॉर्इंटवरुन हे दृश्य टिपले.
 
 
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत
पन्हाळ्यावरील पुसाटी पॉर्इंट आणि मसाई पठारावरुन शुक्रवारी सायंकाळी नव्याच्या पौर्णिमेला सहा वाजण्याच्या सुमारास एकाच क्षितीजरेषेवर सूर्यास्त व चंद्रबिंब अवतरले. प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. चंद्र सूर्याच्या बरोबर विरुध्द बाजूला असतो. त्यामुळे जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा चंद्र उगवत असतो, मात्र,प्रत्येक वेळी सूर्यास्ताची आणि चंद्रोदयाची वेळ एकच नसते. कारण चंद्राची पृथ्वीभोवतीची थोडी कललेली कक्षा. चंद्राची कक्षा ही सूर्यआणि पृथ्वी यांना जोडणाºया काल्पनिक रेषेच्या प्रतलास समांतरअशी नाही. मात्र,पृथ्वीभोवतीच्या एका फेरीत ही कक्षा दोन वेळा या काल्पनिक प्रतलास छेदते. त्या दोन्ही वेळेस ग्रहणे घडून येतात. आज, शुक्रवारी माघ पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. यामुळे यादिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अगदी सरळ रेषेत होते. आपण आता पृथ्वीवर अशा ठिकाणी आहोत,की चंद्रोदयाची वेळ सूर्यास्ताच्या काही मिनिटेआधीच मिळाली. शनिवारी चंद्रोदयाची वेळ ही ५0 मिनिटे उशिरा असल्यामुळे आज खगोल निरिक्षकांनी एकत्र सूर्य आणि चंद्रबिंब दर्शनाचा अनुभव घेतला.