शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- रमेश कदमला १६ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: January 2, 2017 18:12 IST

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 2 - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आमदार रमेश ...

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 2 - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आमदार रमेश कदम यास सोलापूर जिल्हा न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पोलीस कोठडीत पोलिसांनी जाणीवपूर्वक छळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार आ. रमेश कदम याला न्यायालयासमोर केल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान, बुधवार २८ डिसेंबर २०१६ रोजी सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून आमदार कदम याला ताब्यात घेतले. गुरूवार २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता आ. रमेश कदम यांना न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर पुन्हा आ. रमेश कदम यास सोमवार २ जानेवारी २०१७ रोजी तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने कदम यांना १६ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या वेळी आमदार कदम यांनी न्यायालयासमोर स्वत: म्हणणे मांडताना सांगितले की, पोलीस कोठडीत असताना मला अपमानास्पद वागणूक दिली असून, माझा छळ केला, असा रमेश कदमने केला. याविरोधात मी उच्च न्यायालय आणि मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. यानंतर आ. कदम याला मेडिकल चेकअप करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर कोठडीत रवानगी करण्यात आली. यावेळी रुग्णालय परिसरात रमेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती़ त्यामुळे पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता. -----------------------------काय आहे प्रकरणलोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयातून 11 लाख 75 हजार रुपये सुनील सुभाष चव्हाण या नावाने सोलापूर कार्यालयाला पाठविले होते. ती रक्कम आमदार कदम याच्या मोहोळ येथील कार्यालयात काम करणाऱ्या सुनील बचुटे याने काढून घेऊन वाहन खरेदी केले. या गुन्ह्यात बचुटेसह आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. चौकशीदरम्यान महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यालाही आरोपी करण्यात आले आहे.

https://www.dailymotion.com/video/x844n0f