ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 05 - राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला असल्या कारणाने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. पावसाच्या पाण्यात गाड्या वाहून जातानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओत पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे की, दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्यासारख्या जात आहेत. आपली गाडी वाचवण्याचा प्रयत्न लोक करताना दिसत आहेत, पण पाण्यापुढे त्यांचा टिकाव लागतं नाही आहे. त्यामुळे हे लोक 'पाऊस आला धावून, गाड्या गेल्या वाहून' असंच म्हणत असावेत.