शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- ग्रामपंचायतीच्या इमारतीत चालणारे असेही प्राथमिक आरोग्य केंद्र

By admin | Updated: January 31, 2017 18:08 IST

वाशिम तालुक्यातील वारला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यांमध्ये सुरू आहे.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 31 - स्वतंत्र जागा व इमारत उपलब्ध नसल्याने वाशिम तालुक्यातील वारला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यांमध्ये सुरू आहे. साधारणत: आठ वर्षांपूर्वी अनसिंग येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने अनसिंगचे प्राथमिक आरोग्य केंद्र वारला येथे स्थलांतरित करण्यात आले. तेव्हापासून या आरोग्य केंद्राला स्वतंत्र जागा उपलब्ध होऊ शकली नाही. ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यांमध्ये आरोग्य केंद्र थाटले असून, भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो. या आरोग्य केंद्रांतर्गत अनसिंग १, अनसिंग २, वारला, उकळीपेन, सावळी, बाभुळगाव, उमरा (शम.), पिंपळगाव असे आठ उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रांमध्ये ३९ गाव अंतर्भूत असून, या एकूण गावातील लोकसंख्या ७० हजारांच्या वर आहे. या आरोग्य केंद्राला स्वतंत्र इमारत नसल्यामुळे आवश्यक ती उपकरणे नाहीत. कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नाही. कर्मचाऱ्यांनादेखील निवासस्थानाची व्यवस्था नाही. समस्येच्या गर्तेत अडकलेल्या या आरोग्य केंद्राकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच एक जागा निश्चित करून तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर इमारतीचे बांधकाम केले जाईल, असे डॉ. सेलोकर यांनी सांगितले.