शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

VIDEO - मॅट अभावी प्रतिभावान कुस्तीपटूंना लाल मातीत करावा लागतोय सराव

By admin | Updated: January 28, 2017 15:54 IST

 ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 28 -  राज्यातील नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये कुस्तीच्या तालमींची मोठी परंपरा आहे. तशीच ती ...

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 28 -  राज्यातील नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये कुस्तीच्या तालमींची मोठी परंपरा आहे. तशीच ती अनेक गावांत आणि शहरांतही आहे. मात्र शहरासह सर्वच गावांमध्ये आता थोडयाफार फरकाने बलोपासनेच्या पद्धतीत आरपार बदल होत आहेत. कुस्तीला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्याने हा बदल होत आहे; मात्र लाल मातीच्या आखाडयात खेळणारे अनेक पहिलवान अजूनही आधुनिक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. 
 
एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांसाठी डोळे लावून बघण्याची वेळ असताना वेगवेगळ्या तालमींमध्ये दर्जेदार पहिलवान घडत असताना त्यांना व्यावसायिक कुस्तीसाठी आवश्यक मॅटचे दर्शनही होत नसल्याने तालमींमध्ये अजूनही लाल मातीचाच धुरळा उडतो आहे. लाल मातीत लोळताना कडाकड शड्ड ठोकल्याने तरुणाईला हुरूप येतो हे तितकेच खरे असले तरी व्यावसायिक कुस्ती खेळण्यासाठी मॅटची किती गरज आहे, हे वास्तव राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सुवर्णपदक पटकावणा-या कुस्तीपटू गीता फोगाट यांच्या संघर्षावर चित्रित झालेल्या ‘दंगल’ चित्रपटातून संपूर्ण देशासमोर आले आहे. 
 
नाशिकच्या विविध तालमींमध्येही असेच दुर्देवी वास्तव पाहायला मिळत आहे. शहरातील तीनशे  वर्षाची परंपरा असलेल्या दांडेकर-दीक्षित तालीम संघातील पहिलवानही गेल्या अनेक वर्षापासून मॅटपासून वंचित आहेत. त्यांना केवळ मातीतच सराव करावा लागतो आहे. या तालमीत काही मुलीही कुस्तीचे प्राशिक्षण घेतात. यातील शिल्पा तांबोळी ही महिला कुस्तीपटू राज्यपातळीवर कुस्ती खेळत असून, तिने विविध स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. 
 
तिला सराव करण्यासाठी तालमीत मॅट उपलब्ध होत नसल्याने विविध स्पर्धासाठी पुरेसा सराव होत नाही. तालमीत दहा वर्षापूर्वी मिळालेली एकच मॅट असून, तिची दुरवस्था झाली आहे. या फाटलेल्या मॅटवरच काही पहिलवान सराव करतात. तर अनेकजण या फाटलेल्या मॅटऐवजी मातीतच सरावाला प्राधान्य देतात. त्यामुळे क्रीडा विभागाने शहरातील तालीम संघांना मॅट आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 
 
शहरात गुलालवाडी व्यायामशाळा, यशवंत व्यायाम-शाळा, मोहन मास्तर तालीम, दांडेकर-दीक्षित तालीम, रोकडोबा तालीम, छपरीची तालीम, मधली होळी तालीम, गणोशवाडी तालीम, ओकाची तालीम अशा अनेक व्यायामशाळांचा बोलबाला होता. परंतु क्रीडा विभागाच्या अनास्थेमुळे तालमींना मॅट तर मिळालीच नाही परंतु वारंवार मागणी करूनही चांगला प्रशिक्षक मिळत नसल्याची खंत उत्तर महाराष्ट्र तालीम संघाचे उपाध्यक्ष हिरामण वाघ यांनी दिली. बहुतेक तालमींमध्ये आखाडा असून, कुस्ती बंद झाली आहे. तर काही तालमींच्या हौदातील कुस्ती बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत किमान सुरू असलेल्या तालमींना मॅट आणि चांगले कोच देऊन नाशिकमधील कुस्तीला प्रोत्साहन देण्याची मागणी होत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844q2o