शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

VIDEO : जीवनाचं मोल जपण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची 'फिल्मगिरी

By admin | Updated: January 23, 2017 17:41 IST

ऑनलाइन लोकमत  पुणे, दि. 23 - सध्या राज्यामध्ये पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वाहतुकीचे नियम आणि ...

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 23 - सध्या राज्यामध्ये पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वाहतुकीचे नियम आणि त्याचे पालन यासोबतच अपघातग्रस्तांना मदत अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, एक पोलीस अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून मानवतेच्या दृष्टीकोनातून  'जीवन अमुल्य आहे आणि त्याचं रक्षण करायला पाहिजे' हा ध्यास घेऊन चक्क ह्यफिल्लमगिरीह्णकरीत आहे. आजवर तयार केलेल्या विविध डॉक्युमेंटरीजच्या माध्यमातून अपघातांमागील गांभीर्य प्रकर्षाने मांडणा-या सहायक पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांची नव्यानेच आलेली हेल्मेट वापरासंबंधीची शॉर्टफिल्म सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. महेश सरतापे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील म्हसवडचे राहणारे आहेत. 1995 साली पोलीस दलात भरली झालेले सरतापे सध्या पुण्यामध्ये वाहतूक शाखेत नेमणुकीस आहेत. त्यांना मुळातच कलेची आवड असल्यामुळे विविध विषयांवर शॉर्टफिल्म बनवण्याचा त्यांना छंद आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहतूक शाखेमध्ये काम करीत असल्यामुळे महामार्गांवरील तसेच शहरातील भयानक आणि हृदयद्रावक अपघात, मानवी जिवीताबाबतची उदासिनता, यंत्रणांनी करुन ठेवलेल्या चुका यामुळे अस्वस्थ झालेल्या सरतापेंनी याच विषयावर फिल्म तयार करायचे ठरवले.रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली असताना किंवा अनेकदा जाणिवपुर्वक रुग्णवाहिकेला रस्ता दिला जात नाही. सायरन वाजवत जात असलेल्या रुग््णवाहिकेमध्ये रुग्णाची मृत्यूशी झुंज सुरु असते. लवकरात लवकर रुग्णालयात पोचल्यास त्याचा जीव वाचण्याच्या शक्यता वाढतात. परंतु, रुग्णवाहिकेला रस्ता दिला जात नसल्यामुळे किंवा रस्ता उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकदा रुग्णांच्या प्राणावर बेतते. हाच विषय घेऊन त्यांनी ह्यरुग्णवाहिकेला रस्ता द्या  ही शॉर्टफिल्म तयार केली. या शॉर्टफिल्मला 30 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी सोशल मिडीयावरुन पसंती दिली. तर नुकतीच त्यांनी हेल्पिंग हँड्स  ही अपघातग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात फिल्म तयार केली होती. अपघात घडल्यानंतर गोल्डन अवरमध्ये जर रुग्णाला मदत मिळाली तर त्याचे प्राण वाचतात. या विषयावरच्या फिल्मला दहा पुरस्कार मिळाले आहेत. यासोबतच राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्येही नामांकने मिळाली आहेत. यासोबतच महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धांवरही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती. गणेशोत्सवामध्ये पोलीस बंदोबस्तात पोलिसांना होणारा त्रास, आरोग्याच्या समस्या, ताणतणाव, नागरिकांकडून न मिळणारा प्रतिसाद, मनस्ताप यावर प्रकाश टाकणारी फिल्मही त्यांनी तयार केली होती. राजू द सेव्हियर ही राजू काची या तरुणाच्या वास्तव जिवनावर आधारीत फिल्मही पसंतीस उतरली. झोपडपट्टीमध्ये राहणारा हा तरुण अपघातग्रस्त, कुजलेल्या, खून झालेल्या, नदी वा नाल्यात वाहत आलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम करतो. पोलिसांना त्याची मोलाची मदत मिळते. या फिल्मलाही 4 पुरस्कार मिळाले आहेत. सरतापेंच्या फिल्म तयार करण्यामागील हेतू अव्यावसायिक असल्याने कलाकारही मानधन न घेता काम करतात. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून कलाकार वाहतूकीचे नियम सर्वांनी पाळावेत याकरिता या शॉर्टफिल्समध्ये आनंदाने काम करतात.

 हेल्मेट वापरण्यामुळे गंभीर अपघात टळू शकतात. आपल्या कुटुंबियांना आपली आवश्यकता आहे. स्वत:साठी नाही तर किमान आई - वडील, भाऊ, पत्नी, बहीण, मुलांसाठी तरी हेल्मेट वापरा असे भावनिक आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले होते. त्यांच्या आवाहनापासून प्रेरणा घेत सरतापेंनी हेल्मेटसंबंधी शॉर्टफिल्म तयार केली. आयुक्त शुक्ला यांनी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शक सुचना दिल्या. त्यांच्या कल्पनेमधून साकारलेली ही फिल्म सोशल मिडीयावर तसेच युट्युबवर हिट झाली आहे.