शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - टाटा हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून छायाचित्रकारांना मारहाण

By admin | Updated: November 5, 2016 06:45 IST

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 04 - टाटा हाऊस येथे सायरस मिस्त्रींच्या पत्रकार परिषदेचे  क्षण कॅमे-यात टिपत असलेल्या छायाचित्रकारांना  येथील ...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - टाटा हाऊस येथे सायरस मिस्त्रींच्या पत्रकार परिषदेचे  क्षण कॅमे-यात टिपत असलेल्या छायाचित्रकारांना  येथील सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास टाटा हाऊसची पत्रकार परिषद पार पडणार होती. या परिषदेला सायरस मिस्त्रींनी हजेरी लावणार असल्याने तेथे पत्रकारांसह छायाचित्रकारांनी हजेरी लावली. २ च्या ठोक्याला टाटा हाऊस येथे पोहचलेल्या मेस्त्रींचे फोटो घेण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले. याच दरम्यान येथील सुरक्षा रक्षकांना धक्काबुकी झाली. दहा मिनिटानंतर मिस्त्री आतमध्ये निघून गेले. मिस्त्री आतमध्ये जाताच १५ ते २० सुरक्षा बाहेर धडकले. त्यांनी धक्काबुकी केली याचा राग धरत छायाचित्रकारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये छायाचित्रकार अतुल कांबळे, एच एल सांजकुमार आणि अर्जीत सेन जखमी झाले आहेत. तिघांवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी कांबळे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. शिवाय छायाचित्रकारांनी घेतलेले फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानुसार याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. यामध्ये मारहाण करणारे तिघा सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही समजते. 

टाटांची दिलगिरी टाटा समूहाने छायाचित्रकार व पोलिसांची माफी मागितली. पोलीस व प्रसारमाध्यमांची आम्हाला जाणीव असून त्यांचा आम्ही आदर करतो, असे समूहाचे प्रवक्ते देबाशिश रे म्हणाले. दरम्यान, मुंबई प्रेस क्लबने या घटनेचा निषेध केला आहे.