शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

VIDEO - मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: August 23, 2016 17:46 IST

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास स्थानिक सरपंचासह ग्रामस्थांनी विरोध केला असून ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन

सुनील शिंदे

नाशिक, दि. २३ : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास स्थानिक सरपंचासह ग्रामस्थांनी विरोध केला असून ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने ही जमीन चित्रनगरी साठी वापरू नये अशी मागणी होत आहे.

शासनाने इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर असणा-या मुंढेगाव येथील ग्रामपंचायतच्या ताब्यात असणारी तब्बल चारशे एकर गायरान जमीनवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाच्या विचारधीन आहे. या ठिकाणी चित्रनगरी उभारू नये अशी मागणी मुंढेगाव ग्रामपंचायतसह ग्रामस्थाकडून होत आहे.दरम्यान दुसऱ्या बाजूला शासनाने चित्र नगरी उभारण्यास कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतने आपली विरोधाची भूमिका स्पष्ट केली आहे.इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात महामार्गालगत असणारी गायरान जमीन शासनाने विविध प्रयोजनासाठी वापरली असताना आता शिल्लक असलेल्या चारशे एकर जागेवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाच्या चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या विचारधीन आहे.त्यासाठी कार्यवाही सुरु झाली असून,या बाबीला स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी कडवा विरोध दर्शविला आहे.

शासनाने या जागेवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी चार हेक्टर, आदिवासी विकास विभागाकरिता २.२० हेक्टर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी १८५० चौरस मीटर भौगोलिक सुधारणा पाणी आणि हायवे साठी १.१०० हेक्टर क्षेत्र, राखीव भूसरल परिवहन भारत सरकार साठी ४९५६ चौरस मिटर व जिल्हास्तरीय व विभाग स्तरीय प्रशिक्षण केंद्र आदी बाबीसाठी शासनाने जागा घेतल्यानंतर उर्विरत जागा चित्रनगरी साठी ताब्यात घेण्याचे शासनाचे धोरण आहे. ही जमीन ताब्यात घेतल्यास ज्या उद्देशासाठी ही जमीन स्थानिक ग्रामपंचायत ने राखून धरली आहे तो संपुष्टात येईल. ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने ही जमीन चित्रनगरी साठी वापरू नये अशी मागणी होत आहे.प्रतिक्रिया

श्री.चंद्रकांत गतीर (सरपंच)गायरान असलेल्या या जमिनीला शासनाने विविध उपक्र मासाठी ताब्यात घेतले आहे.यातील अनेक उपक्र म नामधारी राहिले आहेत. फक्त शासनाचे वर्षानुवर्ष फलक लावून ही जमीन आरिक्षत केली आहे.त्यामुळे ही जमीन ग्रामपंचायतच्या वापराविना पडून आहे. याठिकाणी शिल्लक असणा-या जमिनीवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाचे धोरण असून यामुळे परिसरातील पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने चित्रनगरी उभारण्यास ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा कडवा विरोध आहे.श्री.गोविंद गतीर (ग्रामस्थ)इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या सुपीक शेतजमिनी शासनांने विविध प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत.मात्र शिल्लक असलेल्या जागेवरही शासनाचा डोळा असून या जमिनीही ताब्यात घेऊन त्यावर प्रकल्प उभारण्याचे शासनाचे धोरण आहे.ही बाब गंभीर असून आता मुंढेगाव च्या साडेचारशे एकर जागा चित्र नगरी साठी शासम ताब्यात घेत आहे.हि जागा गायकुरण असल्याने तालुक्यातील हजारो जनावराना चार्या चा आण िपशुधनाचा पोषणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.यामुळे हि चित्रनगरी या ठिकाणी उभारू नये अशी आमची मागणी आहे.श्री.विनोद दळवी(ग्रामस्थ)मुंबई आग्रा महामार्गावर राज्याच्या राजधानी पासून दीड तासाच्या अंतरावर आण िजिल्ह्याच्या ठिकाणापासून वीस किलोमीटर अंतर्रावर हि चित्र नगरी उभारण्याचे शासनाचे धोरण आहे.याबाबत कार्यवाही सुरु झाली असली तरी शासनाने प्रथम ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या शी समन्वय साधने आवश्यक होते.स्थानिकांना विश्वासात न घेता शासनाने एकतर्फी निर्णय घेतला असून शासनाने प्रथम स्थानिकांच्या हरकती जाणून घाव्या व नंतर निर्णय घ्यावा.अन्यथा या ठिकाणी चित्र नगरी होऊ देणार नाही .