ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 30 - समान नागरी कायदा मुस्लीम समाजाच्या शरीयतच्या विरूद्ध आहे. मुस्लीम समाजातील महिलांनाही शरीयतचे नियम मान्य आहेत, हे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. मग केंद्र शासनाने यात हस्तक्षेप का करावा, असा प्रश्न उपस्थित करीत पाच हजार मुस्लीम बांधवांनी शांततेत मूक मोर्चा काढला. मुस्लीम समाजाचा एवढ्या मोठ्या संख्येने निघालेला शहरातील बहुदा हा पहिलाच मोर्चा असावा. ईदगाह मैदानातून दुपारी ३ वाजता अत्यंत शांततेत निघालेला मूकमोर्चा बजाज चौक, बडे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलिसांनी मोर्चा न्यायालय परिसरात अडविला. यानंतर अकरा सदस्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी लोनकर यांना निवेदन सादर केले. मोर्चासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
VIDEO- शरियतमध्ये हस्तक्षेप अमान्य, मोर्चेक-यांचा आक्रोश
By admin | Updated: December 30, 2016 18:02 IST