शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नागपूरकर धावले, नागपूरकर जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 16:07 IST

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 26 - नागपूरकर धावले, नागपूरकर जिंकले. होय, रविवारी भल्या सकाळी उपराजधानीतील विविध मार्ग निळ्या टी ...

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26 - नागपूरकर धावले, नागपूरकर जिंकले. होय, रविवारी भल्या सकाळी उपराजधानीतील विविध मार्ग निळ्या टी शर्ट घातलेल्या धावपटूंनी फुलले होते. पोलीस लाईन टाकळी, सेमीनरी हिल्स, फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, रामनगर, रविनगर, फुटाळा तलाव, वायुसेननानगर, सि.जी.ओ. कॉप्लेक्स, गोंडवाना क्लब, रामगीरी वॉकर्स स्ट्रीट, जी.पी.ओ. चौक, आयकर भवन, सेमीनरी हिल्स परिसरात एक वेगळा उत्साह संचारलेला दिसत होता. निमित्त होते मॅराथॉन स्पर्धेचे. शहर पोलिसांतर्फे आयोजित मॅराथॉन स्पर्धेला रविवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे पाच हजारांवर धावपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. काटोल मार्गावरील पोलीस मुख्यालयाच्या शिवाजी स्टेडिअममधून सकाळी 5.3क् वाजता स्पर्धेला सुरूवात झाली. 3, 5, 1क् आणि 21 किलोमिटर अशा चार गटात मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते. चारही गटात स्पर्धकांनी चांगला सहभाग नोंदवला. सुमारे 5 हजारांवर स्पर्धक चार गटात सहभागी झाले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धकांना शुभेच्छा देत स्पर्धेला हिरवी ङोंडी दाखवली. महामेट्रो कॉपोर्रेशन लि. नागपूर, एल. अ‍ॅण्ड टी, अ‍ॅक्सीस बँक, क्लाउड फॉरेन्सीक टेक्नॉलॉजी, स्पेसवुड, हल्दीराम, 93.5 रेड एफएम, वर्षा अ‍ॅड, ऑरेंज सिटी रनर आदी या स्पर्धेचे प्रायोजक होते. स्पर्धेचे आयोजन शिस्तबद्ध अन् उत्कृष्ट होते. 1क् किलोमिटर गटात धावणा-या स्पर्धकांसाठी दर दीड किलोमिटरनंतर सोललेली संत्री, केळी, माझा अन् बिसलरीच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. वैद्यकीय पथकेही सज्ज होती. महासंचालकांतर्फे कौतूक खास मॅराथॉनच्या निमित्ताने पोलीस महासंचालक सतीशचंद्र माथूर आज भल्या सकाळी नागपुरात पोहचले. विमानाला काहीसा उशिर झाल्यामुळे येता-येताच त्यांनी स्पर्धक आणि आयोजकांची माफी मागितली. पोलीस आणि जनतेचा संवाद वाढावा, त्यांनी मिळून मिसळून काम करावे, अशी पोलीस दलाची भावना आहे. नागपुरात मॅराथॉनच्या निमित्ताने त्याची चांगली सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे, असे मत पोलीस महासंचालकांनी व्यक्त केले. नागपुरकरांच्या खेळाडू वृत्तीचा यातून प्रत्यय आल्याचेही माथूर म्हणाले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहका-यांचे कौतूक केले.

https://www.dailymotion.com/video/x844svb