शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मुंबई - चर्चगेट स्थानकावर भरदिवसा तरुणीचा विनयभंग

By admin | Updated: July 15, 2017 15:37 IST

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील तरुणींना धक्कादायक प्रसंगांना सामोरं जाव लागत असल्याच्या घटना समोर येत आहे. सीएसटी स्थानकावर एका प्रवाशाने तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महिलांच्या आणि खासकरुन तरुणींच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 8 जुलै रोजी घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
 
संबंधित बातम्या
सीएसटी स्थानकात अश्लिल चाळे करणाऱ्या अशोक प्रधानला अटक
मुंबईत दिवसाढवळया त्याने तरुणीसमोर सोडली लाज
तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणाचे विकृत चाळे
विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यास अटक
 
सीसीटीव्हीमध्ये एक तरुणी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लोकलची वाट पाहात उभी असल्याचं स्पष्ट दिसत आहे. यानंतर तिथूनच एक तरुण चालला आहे. तरुणीचं लक्ष लोकलकडे असल्याचं पाहून हा तरुण तिच्या जवळ जाऊन तिला जाणीवपूर्वक स्पर्श करतो. यानंतर तरुणी धावत जाऊन स्वत: त्या तरुणाला पकडते. 
 
आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 
 
आरोपी तरुणाचं मुंबईत कोणताही रहिवाशी पत्ता नाही. तो कालाघोडा परिसरात बहिणीसोबत रस्त्याच्या कडेला राहतो. हे कुटुंब मूळचं मध्य प्रदेशचं राहणारं आहे. गेले काही दिवस सलग अशा प्रकारच्या घटना घडत असल्या कारणाने लोकांमध्ये कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. 
 
सीएसटी स्थानकात अश्लिल चाळे करणाऱ्या अशोक प्रधानला अटक
मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकात ‘तपोवन एक्स्प्रेस’मध्ये तरूणीला पाहून अश्लिल चाळे करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 29 जून रोजी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सीएसटी स्थानकावर हा प्रकार घडला होता. 22 वर्षाची तरुणी कामानिमित्त नाशिकला निघाली होती. यावेळी सीएसटी स्थानकात आल्यावर ती प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर उभ्या असलेल्या ‘तपोवन एक्स्प्रेस’ने नाशिकला जाण्यासाठी निघाली. त्यानंतर स्थानकावर अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे बघून ट्रेनमध्ये थांबलेल्या अशोक प्रधान या विकृत तरुणाने तिच्याकडे पाहून हस्तमैथून करत असल्याचे दिसून आले होते.  या प्रकारामुळे घाबरल्याने ती तरुणी दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्यासमोर असणाऱ्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि अश्लिल चाळे करू लागला. यावेळी तिने पुरावा म्हणून त्या विकृताचा व्हिडिओही काढला. त्यानंतर याची माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी त्यावेळी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. 
 
दरम्यान, या झालेल्या प्रकाराबद्दल मीडियाने बातमी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी अशोक प्रधान याला तब्बल दहा दिवसांनंतर अटक केली होती. अशोक प्रधान हा मुळचा अशोक प्रधान हा भुवनेश्वरचा असून सध्या तो मुंबईत बिगारी काम करतो. 
 
पवईतही घडली अशीच घटना
पवईमध्येही दुचाकीवरुन चाललेल्या एका तरुणाने 19 वर्षीय युवतीला आपल्या पँटची चैन खोलून दाखवली होती. पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजमधून घरी परतत असताना पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. पवई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, आरोपीला पकडण्यासाठी पोलीस इटर्निया बिल्डींगजवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.