शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- मुंबई अभी बाकी हैं!

By admin | Updated: November 6, 2016 15:36 IST

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 6 - मराठा आरक्षण आणि कोपर्डी घटनेतील नराधमांना शिक्षा करा, या मागणीसाठी देशाची आर्थिक राजधानी ...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 6 - मराठा आरक्षण आणि कोपर्डी घटनेतील नराधमांना शिक्षा करा, या मागणीसाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रविवारी मराठा क्रांती मूक मोर्चाची बाईक रॅली धडाडली. चेंबूरहून सुरू झालेली बाईक रँली सीएसटीला पोहोचली, तरी रॅलीचे शेवटचे टोक चेंबूरमध्ये होते. यावरून रॅलीमध्ये रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचा दावा रॅलीचे मुख्य संयोजक वीरेंद्र पवार यांनी केला. राज्यभर निघणाऱ्या मूक मोर्चांप्रमाणेच बाईक रॅलीमध्येही शिस्तबद्धता दिसून आली. सुमारे १० वाजण्याच्या सुमारास रॅलीला सोमय्या मैदानावरून सुरुवात झाली. सायन, माटुंगा, लालबाग, भायखळा मार्गे रॅली तासाभरातच सीएसटीला पोहोचली. मुंबई मनपा मुख्यालयासमोर स्थापित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून बाईक नॉनस्टॉप सुरूच होत्या. दरम्यान मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती. संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर झिरो पार्किंग करण्यात आले होते. त्यामुळे एकाही ठिकाणी रॅलीला अडथळा निर्माण झाला नाही. जे जे उड्डाणपुलावरून भायखळ्यातील खडा पारसी येथे रॅलीची सांगता झाली आहे. 

नेत्यांची गर्दीआमदार भाई जगताप, भरत गोगावले यांच्यासह विनोद घोसाळकर, अभिनेता सुशांत शेलार यांसह अनेक नेते व सेलिब्रिटी या मोर्चात सामील झाले होते. तर मुंबईच्या डबेवाल्यांसह लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासारख्या अनेक संघटना आणि मंडळांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले.

मराठा क्रांती मोर्चामुळे वाहतूक कोंडीमराठा  क्रांती मोर्चाची रविवारी मुंबईत बाईक रॅली निघाली होती. यामध्ये मोठी गर्दी होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी मुंबईत जाणारी सर्व वाहतूक प्रिय दर्शनी सर्कल येथे बंद करुन ही वाहतूक वडाळा मार्गावरुन पळवली होती. त्यामुळे ठाणे-मुंबई आणि पनवेल -सायन मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. या रॅलीमध्ये ४० ते ५० हजार दुचाकी सहभागी झाल्या असल्याचा दावा अयोजकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आज संपूर्ण मुंबईत चक्काजाम झाला होता. 

https://www.dailymotion.com/video/x844h1a