शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : आमदार खोपडेंचा पोलिसांसोबत वाद, व्हिडिओ व्हायरल

By admin | Updated: February 22, 2017 07:47 IST

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 22 - पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार कृष्णा खोपडे यांचा पोलिसांसोबत झालेल्या वादाचा ...

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22 - पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार कृष्णा खोपडे यांचा पोलिसांसोबत झालेल्या वादाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सावधगिरीची भूमिका घेतली असून, या प्रकरणाची कागदोपत्री नोंद करतानाच त्या व्हिडीओ क्लीपची चौकशी सुरू केली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरंजीपुरा आहे. प्रभाग २१ मधील तेलीपुरा मतदान केंद्राजवळ आज दुपारी काही जण गोंधळ घालत होते. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. तेवढयात तेथे अ‍ॅक्टीव्हावरून आ. कृष्णा खोपडे आले. त्यांनी तेथे बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचा-यांना विचारणा केली. त्यांनतर पोलिसांसोबत आ. खोपडेंचा वाद झाल्याचे या व्हिडीओ क्लिपमध्ये दिसून येते. हा वाद सुरू असतानाच लकडगंजचे ठाणेदार सत्यवान माने तेथे आले. त्यानंतर प्रकरण निवळले. आ. खोपडे आपल्या कार्यकर्त्यांसह निघून गेले. मात्र, नंतर या वादाची कथित व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधान आले. पोलिसांनी कारवाईला सुरूवात केल्याचीही सर्वत्र चर्चा होती. दरम्यान, या प्रकरणात काय कारवाई झाली, ते जाणून घेण्यासाठी परिमंडळ - ३ चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी व्हिडीओ क्ललीपची चौकशी केली जात असल्याचे लोकमतला सांगितले.v

https://www.dailymotion.com/video/x844ruq