शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - महाराष्ट्रात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फोडले फटाके

By admin | Updated: June 28, 2017 16:38 IST

बॉलिवूडमधल्या आघाडीच्या कलाकारांचे आज लाखो चाहते आहेत. टि्वटर-फेसबुक या सोशल माध्यमांवर हे चाहते आपल्या आवडत्या हिरो-हिरॉईनला फॉलोही करतात.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 28 - बॉलिवूडमधल्या आघाडीच्या कलाकारांचे आज लाखो चाहते आहेत. टि्वटर-फेसबुक या सोशल माध्यमांवर हे चाहते आपल्या आवडत्या हिरो-हिरॉईनला फॉलोही करतात. पण बॉलिवूडचा दबंग सलमान खानचे फॅन्स इतर कलाकारांच्या फॅन्सपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असलेले सलमानचे हे लाखो फॅन्स रस्त्यावर उतरुन त्याच्यासाठी जल्लोष करण्यामध्येही मागे नसतात.  
 
एखाद्या गुन्हेगारी प्रकरणात सलमानची सुटका झाली की, हे चाहते त्याच्या घराबाहेर जमून जल्लोष करतात. सध्या सलमानचा टयुबलाईट सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सलमानचे अतिउत्साही चाहते कुठल्या थराला जाऊ शकतात ते पाहायला मिळाले. सुदैवाने त्यांच्या कृतीमुळे कुठली दुर्घटना घडली नाही. 
 
आणखी वाचा 
VIDEO : शाहरुखच्या अतिउत्साही चाहत्यांनी थिएटरमध्ये फोडले फटाके
 
महाराष्ट्रातील मालेगाव येथील थिएटरमध्ये सलमानचा टयुबलाईट सिनेमा प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये चित्रपटाचा खेळ सुरु असताना सलमानची एंट्री होताच काही अतिउत्साह चाहत्यांनी चक्के थिएटरमध्ये फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सुदैवाने त्यावेळी कोणती दुर्घटना घडली नाही. फटाक्यांमुळे थिएटरमध्ये आग भडकली असती तर, अनेकांचा जीव धोक्यात आला असता. 
 
यापूर्वी मालेगावच्या उपकार थिएटरमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची एंट्री होताच अशा प्रकारे फटाके फोडण्यात आले होते. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या "ए दिल है मुश्किल" सिनेमामध्ये शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. ज्यावेळी सिनेमामध्ये शाहरुखची एन्ट्री झाली त्यावेळी उपकार थिएटरमध्ये त्याच्या चाहत्यांनी चक्क फटाके फोडून आनंद साजरा केला. 
 
शाहरुखच्या "एक तरफा प्यार की ताकद" या डायलॉगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा उपकार थिएटरमधील त्याचे चाहते भलतेच खूश झाले. शाहरुखला पाहून त्याचे चाहते इतके खूश झाले की आनंदाच्या भरात त्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला होता. ज्यावेळी फटाके फोडण्यात आले तेव्हा थिएटरमध्ये 900 प्रेक्षक उपस्थित होते. फटके फोडल्याने थिएटरचा काही भागदेखील जळाल्याचीही माहिती समोर आली होती.