शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- राजीनामा देतो म्हणणे शिवसेनेचा राजकीय स्टंट- रावसाहेब दानवे

By admin | Updated: February 9, 2017 19:08 IST

ऑनलाइन लोकमत वर्धा, दि. 9 - राज्यात २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांच्या निवडणुका आहे. यामध्ये शिवसेना आणि भारतीय ...

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 9 - राज्यात २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांच्या निवडणुका आहे. यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढतो आहे. निवडणुकीचा स्टंट म्हणून एखादा पक्ष आम्ही राजीनामा देतो म्हणत असेल, तर मला वाटते त्याला गांभीर्याने घेण्याचे कारण नाही, असा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी येथे केला.सेलू तालुक्यातील येळाकेळी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेअंती पत्रकारांशी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आमच्या दोन्ही पक्षांची युती या निवडणुकीमध्ये नाही. परंतु राज्य सरकारमध्ये आम्ही मिळून काम करतो. शिवसेनेने भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा काढलेला नाही. राजीनामा खिशामध्ये घेऊन फिरतो, असे जे ते म्हणत असले तरीही ते राजीनामा देणार नाही. याची मला खात्री आहे. हे सरकार पाच वर्षे चालणारे सरकार आहे. सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. अतिरेक्यांना बनावट नोटा देऊन भारतात पाठवले होते. आता नोटाबंदीमुळे अतिरेक्यांना जायला पैसे नाही. त्यामुळे बऱ्याच अतिरेक्यांनी सरकारला समर्थन दिलेले आहे. पाकिस्तानातीलच ते चारशे अतिरेकी असल्याचे सांगून नोटाबंदीचे समर्थन खा. दानवे यांनी यावेळी केले. यावेळी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, राणा रणनवरे यांच्या भाजपाचे उमेदवार उपस्थित होते. गोपीनाथ मुंडेंच्या वाढदिवसाबाबतचे वक्तव्य बिनबुडाचेअजित पवारांनी गोपीनाथ मुंडेंबाबत जे वक्तव्य ते अत्यंत निराधार, चुकीचे आणि बिनबुडाचे आहे. गोपीनाथराव या राज्याचे एक ज्येष्ठ नेते होते. तळागाळापर्यंत पोहोचलेले नेते होते, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याला खोडून काढले.

https://www.dailymotion.com/video/x844qta