शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शेतीत कल्याण साधणारी ‘कल्याणी’!

By admin | Updated: October 20, 2016 13:05 IST

शिकलेली आई, घर पुढे नेई' असे म्हटले जाते. अकोला जिल्ह्यातील सिंदखेड मोरेश्वर गावातील एका शिकलेल्या आईने आपले घरच नाही तर आपली शेती अन गावालाही समोर नेले

नीलिमा शिंगणे, ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. २० - 'शिकलेली आई, घर पुढे नेई' असे म्हटले जाते. अकोला जिल्ह्यातील सिंदखेड मोरेश्वर गावातील एका शिकलेल्या आईने आपले घरच नाही तर आपली शेती अन गावालाही समोर नेले. कल्याणीताई सोनोने असं या महिलेचं नाव. विदभार्तील शेतकरी आत्महत्यांच्या अस्वस्थेतून शेतीकडे वळलेल्या कल्याणीताई यांनी आज आपल्या शेतीतील वेगवेगळ्या अन नाविन्यपूर्ण प्रयोगातून यशस्वी भरारी घेतली. विशेष म्हणजे एम.ए. इंग्रजी असे उच्चशिक्षण घेतलेल्या कल्याणीताई यांनी प्राध्यापकाची नोकरी नाकारत खेड्यात राहून शेतीला एक नवी ओळख दिली. बाशीर्टाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्वर गाव.गावातील किसनराव सोनोने पंचक्रोशीतील मोठे प्रस्थ. सोनोने कुटुंबीयांकडे १०२ एकर शेती. मात्र शेतीचा व्याप जास्त असल्याने हे कुटुंब पारंपारिक शेती करायचे. त्यातच नुकतीच शेती सांभाळायला लागलेला मुलगा अनिल यांचे शिक्षणही सुरु होते. अशातच एम.कॉम. पर्यंत शिक्षण झालेल्या अनिल यांचा विवाह १९८८ मध्ये अकोला जिल्ह्यातील बोरगाव खुर्द येथील माया गावंडे या तरुणीशी झाला. इंग्रजी साहित्यातील एम.ए. पदव्युत्तर शिक्षण झालेल्या 'माया गावंडे' सासरी आता 'कल्याणी सोनोने' झाल्या होत्या. अशातच अकोल्यातील काही नामांकित महाविद्यालयांकडून कल्याणीताईंना प्राध्यापकपदाच्या नोकरीसाठी बोलावणे आले होते. मात्र. त्यांना काहीतर्री नवीन करून दाखविण्याची आस लागली होती. त्यामुळेच त्यांनी अकोल्यात राहायचे नाकारत गावातच राहणे पसंत केले. मजुरांच्या भरवशावर पारंपारिक शेतीतून सोनोने कुटुंबियांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. १९९५ पासून कल्याणीताईंनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली होती. दरम्यान पत्नी कल्याणी यांना मदत करण्यासाठी पती अनिल यांनीही आपल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नोकरीचा राजीनामा देत शेती करण्याचे ठरविले. एका सुखवस्तू कुटुंबातील शिकलेली सून शेती करते यावर काहींनी नाकेही मुरडली तर काहींनी टोमणेही मारले. पण कल्याणीताईंनी आपली दिशा ठरवून घेतली होती. त्यांचा शेतीचा प्रवास २००० सालानंतर एका वेगळ्या वळणावर येवून ठेपला. कारण या दशकातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कल्याणीताईंना अस्वस्थ करून गेल्यात. अन येथूनच त्यांच्या काहीतरी नवीन करून दाखविण्याचे धेय्य ठेवलेल्या प्रयोगशील शेतीचा जन्म झाला.आपल्या वाट्यावर आलेल्या ३७ एकर शेतीला कल्याणीताईंनी आपल्या पतीच्या मदतीने अगदी 'रिझल्ट' देणारी प्रयोगशाळाच बनविली. आधी आपल्या शेतीचा अभ्यास करून आपल्या जमिनीत कोणती पिके येवू शकतात याचा अभ्यास कल्याणीताईंनी केला. राज्यात आणि देशातातील शेतीतील नवीन प्रयोग पाहण्यासाठी त्यांनी पतीसोबत राज्य आणि देशाचा काही भाग पालथा घातला. आता कल्याणीताईंना आपल्या कामाची दिशा मिळाली होती. सर्वात पहिले त्यांनी आपल्या शेतात 'शेड-नेट'मध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली. पण त्या फक़्त लागवडीवरच थांबल्या नाहीत. तर त्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सातत्य यातून ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले. अन २००७ मध्ये जिल्ह्यातील पहिले व्यावसायिक 'शेड-नेट'उभारले. बिगरहंगामी भाजीपाला घेण्याची सोय त्यातून निर्माण झाली होती. यानंतर त्यांनी आपल्या शेतात 'मल्चिंग' पद्धतीने कापसाची लागवड केली. यातून त्यांनी मागील वर्षी एकरी तब्बल २९.६० क्विनटल कापसाचे उत्पन्न घेतले. यावषीर्ही त्यांनी कापसासह टरबूज व ढोबळी मिरचीवर मल्चिंग प्रयोग केला. याशिवाय शेतातच त्यांनी गांडूळ खत निर्मिती सुरु केली. त्यासोबतच फुलशेतीचा पर्याय निवडत शेतात झेंडूची लागवड केली. यावर्षी कांदा, भेंडी या पिकांचा बिजोत्पादन कार्यक्रम राबविला. तर लवकी आणि काकडीचे उत्पादनही यावर्षी त्यांनी घेतले. हे सर्व करतांना त्यांनी उन्हाळ्यातील पिकांसाठी पाण्याची आवश्यकता लक्षात घेत त्यांनी आपल्या शेतात शेत-तळेही तयार करून घेतले. त्यामध्ये नदीचे पाणी पाईपलाईन टाकून सोडण्यात येते.कल्याणीतार्इंन्ना शेतकरी आत्महत्यांच्या अस्वस्थेतून शेती करण्याचे बळ मिळाले, त्याच शेतकऱ्यांच्या घरातील महिलांसाठी 'राधाई' या नावाने बचत गट सुरु केले. आज कल्याणीताई महिला बचत गटाच्या बाशीर्टाकळी तालुक्याच्या समन्वयक आहेत. त्यांच्या या कामाला आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा 'उद्यान पंडित पुरस्कार', पुसदच्या वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा 'कृषी गौरव पुरस्कार' आदी अनेक पुरस्कारांनी गौरविले.सध्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार परिषद आणि जिल्हा 'आत्मा' समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.