शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाचा पहिला खेटा

By admin | Updated: February 12, 2017 13:15 IST

जोतिबाच्या नावानं चांगभलं, केदारनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात व भक्तिमय वातावरणात जोतिबाचा खेट्याला लाखो भाविकांच्या उपस्थितीत

दीपक जाधव /ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 12 - श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथे दख्खनचा राजा जोतिबाच्या नावानं चांगभलं, केदारनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात व भक्तिमय वातावरणात जोतिबाचा खेट्याला लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पौर्णिमेलगतचा रविवार व पहिला खेडा आल्यामुळे भाविकांची गर्दी झाली होती. परंपरेनुसार कोल्हापूरसह सांगली, कराड, सातारा, पुणे, लातूर, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, मुंबई, बेळगावहून भाविक श्रींच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. माघ महिन्यात येणाऱया रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱया या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. केदारविजय  ग्रंथात या खेटय़ाविषयी उल्लेख आढळतो. पूर्वी केदारनाथ (श्री जोतिबा) दक्षिण मोहिम संपवून हिमालयाकडे जाण्यास निघाले असल्याचे करवीर निवासिनी अंबाबाई ला समजताच श्री अंबाबाई कोल्हापूरातून अनवाणी डोंगरावर आली व केदारनाथांना डोंगर सोडून जावू नये अशी विनंती केली. नाथांनी ही भक्त व अंबाबाई चे रक्षण करण्यासाठी जोतिबा डोंगरावरच राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूरहून जोतिबा डोंगरावर पायी खेटे घालण्याची प्रथा सुरू झाली.पहाटे तीन वाजल्यापासून डोंगर दऱ्यातून कुशिरे, पोहाळे, गिरोली, केर्ली, केर्ले, वारणा येथील खडतर परिसरातून वाट काढत जोतिबा डोंगरावर भाविक पोहोचले. चार ते पाच पदरी भाविकांची रांग दर्शनासाठी लागली होती.दरम्यान पहाटे चार वाजता मंदिरात घंटानाद झाल्यानंतर मंदिरातील दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर सकाळी नित्य धार्मिक विधी पार पडल्यानंतर श्रींची आकर्षक पूजा बांधण्यात आली.