शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Video- जस्टिन बिबरच्या लाइव्ह परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल

By admin | Updated: May 10, 2017 23:51 IST

कॅनडियन पॉप सिंगर जस्टिन बिबरची झलक पाहण्यासाठी आज नवी मुंबईतल्या डॉ. डी वाय. पाटील स्टेडिअमवर हजारोंच्या संख्येनं चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी मुंबई, दि. 10 - अवघ्या 12व्या वर्षीच जगभरात नावारुपाला आलेल्या कॅनडियन पॉप सिंगर जस्टिन बिबरची झलक पाहण्यासाठी आज नवी मुंबईतल्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर हजारोंच्या संख्येनं चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईकरच नव्हे तर संपूर्ण देशातील संगीताच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली आहे. तसेच आलिया भट, रविना टंडन सारख्या अभिनेत्री आणि इतरही अभिनेत्यांनी जस्टिनच्या या लाइव्ह कॉन्सर्टला हजेरी लावली आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवरील कार्यक्रमात जस्टिन बिबरला पाहण्यासाठी तरुणाई अक्षरश: वेडी झाली आहे. अनेक तरुणी जस्टिनची एक झलक पाहण्यासाठी गर्दीतून मार्ग काढत आहेत. जस्टिन बिबरचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओंमध्ये पॉपस्टार जस्टिन बिबर गाण्यानं तरुणाईला भुरळ घालताना पाहायला मिळतोय. जस्टिनच्या चाहत्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हे गाणं रेकॉर्ड केले असून, सोशल मीडियावरही जस्टिनचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आज वयाच्या 23 व्या वर्षीच कोट्यवधी डॉलर्सची कमाई करणारा जस्टिन बिबर फोर्ब्सच्या यादीतलाही थर्टी अंडर थर्टी कॅटेगिरीतला मोस्ट फेव्हरिट सेलिब्रिटी आहे. केवळ आपल्या गाण्यांच्या जोरावर तो किती कमाई करीत असेल? भारतीय रुपयांत सांगायचं झाल्यास गेल्या वर्षीची त्याची कमाई 362 कोटी रुपयांच्या घरात होती. 30 वर्षं वयाच्या आतल्या सर्वाधिक कमाई करणा-या सेलिब्रिटींमध्ये जगात जस्टिन बिबरचा सहावा क्रमांक लागतो. आपल्या सुरक्षेसाठी जस्टीन बिबरनं स्वत:चे बॉडीगार्ड सोबत आणले आहेतच, पण त्याच्या खास सुरक्षेची जबाबदारी दुस-या तिसरा कोणी नव्हे, तर सलमान खानच्या शेरा या बॉडीगार्डवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सलमानचे चाहतेही आनंदात आहेत. मात्र जस्टिन बिबरचे नखरे सांभाळण्याची फार मोठी कसरत त्याच्या आजूबाजूला मंडळींना करावी लागते आहे. केवळ आपल्या गाण्यांमुळेच नाही, तर त्याच्या चित्रविचित्र गोष्टींमुळेही तो कायम चर्चेत असतो. त्यामुळे अनेकदा त्यानं वाद ओढवून घेतले आहेत. आताही मुंबईतल्या कार्यक्रमासाठी त्यानं ज्या मागण्या केल्या होत्या, त्यानं अनेकांवर तोंडात बोटं घालायची वेळ आली. 

{{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BT6ykJDDANT/"}}}} {{{{instagram_id####"https://www.instagram.com/p/BT6xxxFhCPp/"}}}}