शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने जळगावकर मंत्रमुग्ध

By admin | Updated: March 18, 2017 23:48 IST

ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 18 -  बंदीश, भैरवी, झुला, अभंग, वेगवेगळे राग, ताल आणि त्याला तेवढ्याच तोलामोलाची संगीत साथसंगत ...

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 18 -  बंदीश, भैरवी, झुला, अभंग, वेगवेगळे राग, ताल आणि त्याला तेवढ्याच तोलामोलाची संगीत साथसंगत यांच्या मिलापाने पं. भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवात दुस-या दिवशी रंग भरले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणा-या भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या ‘फागून दिन चार, सब फुलन फुली बाग डाल डाल’ या बंदिशीने रसिकांच्या टाळ््यांची चांगलीच दाद मिळवित ही बंदिशी सर्वांच्या मनाला भिडली. 
बालगंधर्व सभागृहात सुरू असलेल्या या तीन दिवसीय संगीत महोत्सवात आज बेगम परवीन सुलताना यांचे गायन होणार असल्याने सभागृह रसिकांनी भरगच्च भरले होते. 
 
टाळ््यांच्या कडकडाटात उभे राहून स्वागत
गायनासाठी बेगम परवीन सुलताना रंगमंचावर येताच रसिकांनी उभे राहून टाळ््या वाजवित त्यांचे स्वागत केले. गायनापूर्वी त्यांनी संवाद साधत महाराष्ट्र शासनाच्या या पुरस्काराबद्दल आभार मानत या संगीत महोत्सवाचे तोंडभरून कौतुक केले व यामध्ये आम्हाला गायनाची संधी दिली या बद्दल आभार व्यक्त केले. 
बेगम परवीन सुलताना यांनी राग यमनने आपल्या गायनास सुरुवात केली. त्यानंतर राग बसंतबहारमध्ये सादर केलेल्या ‘फागून दिन चार, सब फुलन फुली बाग डाल डाल’ या बंदिशीने तर सुरुवातीपासून अखेरपर्यंत टाळ््या मिळविल्या. बंदिशीतील आलाप संपूर्ण परिसरात घुमला व लयातील चढ-उतार तर सर्वांना चांगलाच भावला. त्यानंतर त्यांनी भैरवी सादर केली व उभे राहून रसिकांना हात जोडत निरोप घेतला. यावेळी त्यांना मुकुंदराज देव (तबला), श्रीनिवास आचार्य (संवादिनी), शादाब सुलतान खान व अनघा नाईक (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 
तत्पूर्वी देबवर्णा बासू यांनी शास्त्रीय गायन सादर केले. यामध्ये त्यांनी मारू बिहाग रागाने गायनास सुरुवात केली. त्यानंतर झुला हे उपशास्त्रीय गायन सादर केले आणि दादरा ताल धृप कल्याण रागातील ‘कदरा नाल लाया अखिया’ हे गीत सादर केले. त्यांना देवेंद्र देशपांडे (हार्मोनियम), गणेश तानावडे (तबला) यांनी साथसंगत केली. 
 
झपताल व अभंगाचा संगम
धनंजय हेगडे यांनी विविध ताल व अभंगाचा संगम घडून आणला. यामध्ये त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करताना अभोगी रागमध्ये मध्यलय झपतालात ‘चरण धर आये...’ हे गायन सादर केले. त्यानंतर धृप तीन ताल ‘दिन दयालू परमेश’ आणि धृप एक ताल ‘लाज रखो मोरी’ या बोलीत सादर केले आणि ‘संतभार पंढरीत...’ या अभंगाने समारोप केला. त्यांना निरंजन लेले (हार्मोनियम), मंदार पुराणिक (तबला) यांनी साथसंगत केली. 
 
सरोद वादनाने समारोप
अभिषेक लाहिरी यांच्या सरोद वादनाने दुस-या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला. 
 
वादा है मेरा, मै फिर आऊंगी
गायनानंतर संवाद साधत बेगम परवीन सुलताना यांनी पुन्हा एकदा जळगावला येण्याचे वचन दिले. असे रसिक असले तर रात्रभर गाता येईल असे म्हणत जळगावकर रसिकांचे कौतुक केले आणि ‘वादा है मेरा, मै फिर आऊंगी’ असे सांगताच रसिकांनी टाळ््यांचे याचे स्वागत केले. मधून-मधून त्यांनी मराठीत संवाद साधला. 
 
https://www.dailymotion.com/video/x844ucw