महेश सरनाईक
सिंधुदुर्ग, दि. ७ : सिंधुदुर्ग-कसाल येथे प्रथमच धावणार तुषार परब या तरूणाची वातानुकुलित रिक्षा असा मेसेज आणि रिक्षाचा फोटो गेले काही दिवस सोशल मिडीयावर (वॉटसअप, फेसबुक) वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत होता. मात्र, हा मेसेज फेक असून त्याबाबतच्या तर्कविर्तकांना पूर्णविराम देण्याचे काम आॅनलाईन लोकमतने केले आहे. कुडाळ तालुक्यातील कसाल येथील तुषार परब या युवकापर्यंत पोहचत याबाबतचा पोलखोल केला आहे. कर्नाटक येथील आपल्या एका मित्राने आपल्या रिक्षाचा फोटो मॉर्फ करत हा प्रकार केला आहे. या प्रकाराबाबत सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माझी रिक्षा पूर्वीप्रमाणेच आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही, असे तुषार परब याने लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. त्याचा व्हिडिओ आपणासाठी आम्ही देत आहोत.