शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वंचित मुलींच्या शिक्षणासाठी केतकीने घेतला पुढाकार

By admin | Updated: February 11, 2017 23:48 IST

ऑनलाइन लोकमत   जळगाव, दि.11 - अनेक मुलींना शिक्षणाची तसेच आयुष्यात खूप पुढे जाण्याची आवड असते, मात्र परिस्थितीमुळे त्या ...

ऑनलाइन लोकमत
 
जळगाव, दि.11 - अनेक मुलींना शिक्षणाची तसेच आयुष्यात खूप पुढे जाण्याची आवड असते, मात्र परिस्थितीमुळे त्या शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे अशा मुलींच्या शिक्षणासाठी केतकी फाउंडेशन स्थापन करुन फाउंडेशनच्या माध्यमातून या वंचित मुलींना मदत करण्यात येणार असल्याचे अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने जळगावात जाहीर केले. 
जळगाव येथे खाद्य व कला संस्कृतीचे दर्शन घडविणा-या बहिणाबाई महोत्सवाच्या उद््घाटनासाठी शनिवारी ती जळगावात आली असताना आपल्या उद््घाटनपर मनोगतात तिने ही घोषणा केली. 
बोलण्यास सुरुवात करताच तिने उपस्थितांना जोरदार नमस्कार करीत जळगावात आल्याचा खूप आनंद झाल्याचे सांगितले. आम्ही माटेगावकर म्हणजे खान्देशातील, त्यामुळे येथे येवून मला घरी आल्यासारखे वाटत असल्याचे केतकी म्हणाली. 
यश स्वत:साठी ठेवले तर तो स्वार्थ ठरेल केतकी म्हणाली की, यापूर्वी जी गोष्ट मी कोठे सांगितली नाही, ती जळगावाकरांशी ‘शेअर’ करायची आहे, असे सांगून तिने सर्वांचीच उत्कंठा वाढविली.  ती पुढे म्हणाली की, तानी चित्रपट पाहून खूप मुली मला भेटायला आल्या. त्यात एक मुलगी होती ती रस्ते झाडणारी. ज्यातून तिला केवळ २० रुपये रोज मिळत होता. तिचे मोठे स्वप्न होते, मात्र परिस्थितीमुळे तिचे शिक्षण थांबविण्यात आले होते. तानी चित्रपट पाहून तिच्या आई-वडिलांनी तिचे शिक्षण पुन्हा सुरू केले व आज ती मुलगी चीनमध्ये आहे. अशा कितीतरी मुली आहे, ज्यांना शिक्षण घेऊन मोठे व्हायचे आहे, मात्र परिस्थितीपुढे त्या हारतात. अशा मुलींना शिक्षण मिळावे यासाठी केतकी फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून मुलींच्या शिक्षणासाठी ते काम करणार आहे. तानी व इतर चित्रपटांमुळे मला जे यश मिळाले ते मी केवळ स्वत:साठी ठेवले तर तो स्वार्थ ठरेल, असेही तिने नमूद करीत आपल्या उदात्त हेतूचे दर्शन घडविले. तिच्या या घोषणेला जळगावकरांनी भरभरून टाळ््यांची दाद दिली. 
 
दोन ओळीत आयुष्याचा सार
आज ज्यांच्या नावाच्या महोत्सवाचे उद््घाटन माझ्या हस्ते उद््घाटन होत आहे, त्या महान कवीयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याच दोन ओवी मी काकस्पर्श चित्रपटात गायल्या होत्या, याचीही तिने आठवून करून दिली. तसेच ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर....’ या दोन ओळीतच संपूर्ण आयुष्याचा सार सांगणाºया या ओळी असल्याचे ती म्हणाली. 
 
https://www.dailymotion.com/video/x844qz0