शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियंका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

VIDEO - महिलांच्या सशक्तीकरणात लोकमत सखीमंचची महत्वाची भूमिका - सुकन्या कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 23:08 IST

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नाटयकलेला प्रोत्साहन देऊन महिलांच्या सशक्तीकरणात लोकमत सखीमंचने महत्वाचा भूमिका बजावली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - लोकमत वर्तमानपत्राबरोबर माझे फार जुने नाते आहे. लोकमत सखी मंचच्या माध्यमातून नाटकांच्या दौ-यासाठी ग्रामीण भागात फिरले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नाटयकलेला प्रोत्साहन देऊन महिलांच्या सशक्तीकरणात लोकमत सखीमंचने महत्वाची भूमिका बजावली आहे अशा भावना पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुकन्या कुलकर्णी- मोने यांनी व्यक्त केल्या. त्यांना रंगभूमी स्त्री विभागात लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. डॉक्टर उल्हास पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
facebook.com/lokmat
 
सुकन्या कुलकर्णी-मोने
आपणच काढलेला आपला फोटो म्हणजे ‘सेल्फी.’ याच नावाच्या नाटकाने मराठी रंगभूमीवर आपले वेगळे स्थान कमावले असून, त्यात कडक शिस्त असणा-या स्वाती कवठेकरने रसिकांवर राज्य केले. ही भूमिका साकारली आहे सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी. स्वभावगुणांची काही वैशिष्ट्ये असतात. त्याला साजेसे काही कलाविष्कार करण्याची संधी मिळाली, तर त्या व्यक्तिरेखेला सहजसुंदरतेची झालर लागते. ‘सेल्फी’ नाटकातील शिस्तप्रिय स्वाती साकारताना, ही सहजता सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्या अभिनयाचे बलस्थान ठरली आहे. नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकेतून आपल्या अभिनयकौशल्याने रसिकमने जिंकणारी सुकन्या कुलकर्णी मोने म्हणजे, कडक शिस्तीचे एक आगळेवेगळे रसायन. अशाच तिच्या स्वभावातील अंतरंगात डोकावणारं नाटक ‘सेल्फी’. या नाटकात तिने स्वाती कवठेकर ही भूमिका साकारली. वेगवेगळ्या स्वभावाच्या पाच मैत्रिणी रेल्वे स्टेशनवरील वेटिंगरूममध्ये भेटतात आणि तिथेच हे नाटक जन्माला येते. त्या मैत्रिणींचे भावविश्व मांडणा-यांपैकी नर्स असूनही, शिक्षिकेची कडक शिस्त असणा-या स्वाती कवठेकरने रसिकांवर राज्य केले. गुरू सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडे भरतनाट्यम् शिकत असताना ‘दुर्गा झाली गौरी’ या ‘आविष्कार’च्या नाटकाद्वारे सुकन्या कुलकर्णी यांनी रंगमंचावर पदार्पण केले. त्यानंतर, ‘झुलवा’ आले. वामन केंद्रे यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक बरेच गाजले. या नाटकातल्या अप्रतिम अभिनयासाठी सुकन्याला अनेक पारितोषिके मिळाली. ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकानेही पुढे इतिहास घडवला. "कश्मकश", "शांती", "महानगर" अशा मालिकांमधून आणि "ईश्वर", "एकापेक्षा एक", "वारसा लक्ष्मीचा", "सरकारनामा" अशा चित्रपटांमधून त्यांचा सहजसुंदर अभिनय दिसून आला. "सरकारनामा" आणि "वारसा लक्ष्मीचा" या चित्रपटांसाठी सुकन्याला फिल्मफेअर पारितोषिकेही मिळाली. ‘फॅमिली ड्रामा’ या नाटकाद्वारे ब-याच काळानंतर सुकन्याने व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन केले. या नाटकातल्या सुमती करमरकर या त्यांच्या भूमिकेचे एकमुखानं कौतुक झाले. रोजच्या ताणतणावांवर उतारा म्हणून सुमती जे काही उपाय योजते ते भन्नाट आहेत. आता ‘सेल्फी’तूनही त्या स्वाती कवठेकरच्या रूपाने कडक शिस्तीचे महत्त्व सांगताहेत. त्याचे कौतुक होत आहे.
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४  कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
lmoty.lokmat.com