शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ‘एक्सप्रेस वे’वर सुटीचा ब्लॉक

By admin | Updated: August 14, 2016 05:47 IST

शनिवार, रविवारला स्वातंत्र्यदिनाची (सोमवार) जोडून आलेल्या सुटीमुळे हजारोंच्या संख्येने मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडल्याने शनिवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर

लोणावळा (पुणे) : शनिवार, रविवारला स्वातंत्र्यदिनाची (सोमवार) जोडून आलेल्या सुटीमुळे हजारोंच्या संख्येने मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडल्याने शनिवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. पुण्याकडील मार्गिकेवर अमृतांजन पूल ते खालापूर टोलनाक्यापर्यंत जवळपास १३ ते १५ किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने द्रुतगती महामार्ग अक्षरश: ‘कासवगती’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.द्रुतगती मार्गावर खोपोली फूड मॉल ते लोणावळ्यापर्यंत घाटक्षेत्र आहे. या परिसरात पुण्याकडे येणाऱ्या वाहनांचा वेग चढणीमुळे कमी होतो. त्यातच शनिवारी हजारोंच्या संख्येने या मार्गावर वाहने वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बहुतांश पर्यटकांचा दिवस वाहतूककोंडीतच गेला. दहा ते पंधरा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना तब्बल दोन ते तीन तास तिष्ठावे लागल्याने पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महामार्ग पोलीस, आयआरबी व डेल्टा फोर्स सर्वतोपरी प्रयत्न करत होते. मात्र, वाहनांच्या अफाट गर्दीपुढे पोलीसही हतबल झाले होते. खोपोली परिसरात पर्यायी मार्ग म्हणून द्रुतगतीवरील वाहने खोपोली गावातून वळविल्याने खोपोली गावातदेखील वाहतूककोंडी झाली होती. लोणावळा शहरात तुलनेत गर्दी कमी होती.- मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडीलागोपाठ आलेल्या सुट्यांमध्ये वीकेण्डसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे अचानक सकाळी वाहनांची संख्या मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर वाढली. त्यामुळे या महामार्गावर शनिवारी सकाळी काही काळ वाहतूककोंडी पाहण्यास मिळाली. याचा परिणाम ठाणे शहरातील साकेत रोड आणि मुंबई-नाशिक महामार्ग व कळवा-मुंब्रा रोडवर पाहण्यास मिळाला. यामुळे शहरातील वाहतुकीचे सकाळी ९.३० वा.च्या सुमारात १२ वाजले. याचदरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावरही मुंबई-नाशिकसारखे चित्र होते. मात्र, वाहतूककोंडी नव्हती. तर, ती धीम्या गती सुरू होती. ती पूर्वपदावर येण्यासाठी दोन तास लागले.