शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

VIDEO - हिंदू मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक परंपरा

By admin | Updated: October 12, 2016 16:44 IST

पुरंदर तालुक्याच्या दक्षिण टोकाला निरा नदीच्या तीरावर वसलेले तोंडल हे गाव. याठिकाणी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सामाजिक सलोख्याची सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आजही

ऑनलाइन लोकमत
परिंचे, दि. 11- पुरंदर तालुक्याच्या दक्षिण टोकाला निरा नदीच्या तीरावर वसलेले तोंडल हे गाव. याठिकाणी  तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सामाजिक सलोख्याची सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आजही भक्तीभावाने जपली जात आहे. मोहरमच्या वेळी सर्व  मुस्लिम बांधव याच मंदिरात दोन दिवस ताबूत बसवतात. यावेळी सर्व ग्रामस्थ  ताबूताचे दर्शन घेतात. तर मुस्लिम कुटुंब नवरात्रात देवीचा उपवास करतात. 
              सर्व गावाचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दीडशेहून अधिक लोक उपवास करतात.   नवरात्रात येथून तुळजापूरला देवीची पालखी घेऊन जातात. तेथे  देवाची पालखी व भक्तांचे विशेष स्वागत करण्यात येते. गावाचे  वैशिष्ट्य असे की देवीच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये येथील  अहमद इनामदार, रझ्झाक इनामदार, निसार इनामदार, जावेद इनामदार  गुलाब दस्तगीर इनामदार, रमजान इनामदार, रफिक मोकाशी, लतिफ मोकाशी, सोहेल इनामदार,  , फिरोज इनामदार,  व इतर मुस्लिम कुटुंबे मोठ्या  श्रद्धेने व भक्तीभावाने सहभागी होतात. यावेळी नवरात्र संपत असतानाच मोहरम आला आहे. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांना भावनिक किनार लाभली आहे. दसऱ्याच्या दिवशी मंदिरात ताबूत बसवले आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करण्यात येईल. असे काशिनाथ वणवे यांनी सांगितले. 
- तैयद रमजान इनामदार  यांनी सांगितले की अनेक ठिकाणी उपचार घेऊनही डोळ्यांचे  अवघड दुखणे बरे होत नव्हते.  उपचार बंद झाल्यानंतर देवीच्या अाशीर्वादानेच मला पुन्हा दिसू लागले. अशी माझी श्रद्धा आहे. हा माझ्यासाठी चमत्कार होता, असे मी मानतो.   तेव्हापासून गेली अठ्ठावीस वर्षे मी देवीचा उपवास करतो. संपूर्ण नवरात्र काळात मंदिरात असतो. 
-  तोंडल हे गाव पुनर्वसित गाव आहे. वीर धरणामुळे हे गाव सध्याच्या ठिकाणी वसले आहे. जुन्या गावात नदीच्या काठी  तुळजाभवानी मातेचे मंदिर होते,  असे सरपंच रत्नमाला साबळे यांनी सांगितले. गावाच्या विकासाचे सर्व निर्णय याच मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन घेतात असे  दिगंबर वणवे यांनी सांगितले. गावामध्ये  आजही मश्जिद नसून त्याची गरजही  जाणवत नाही असे दस्तगीर  इनामदार यांनी आवर्जून सांगीतले. मंदिरामध्येच  दरवर्षी  ताबूत  बसवण्याचा  कार्यक्रम होतो.